Headlines

Global Maharashtra Breaking News

कुणकेश्वर देवस्थानची यात्रा रद्द…

पालकमंत्री उदय सामंत *💫सिंधुदुर्गनगरी दि२७-:* देवगड तालुक्यातील प्रसिद्ध कुणकेश्वर देवस्थानची 11 ते 13 मार्च दरम्यान होणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रद्द करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात कुणकेश्वर देवस्थानच्या आगामी यात्रा नियोजनाबाबत मंदिराच्या विश्वस्तांसमवेत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आ. वैभव नाईक, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी,…

Read Full News

जिल्ह्यात कोरोनास्थिती नियंत्रणात….

पालकमंत्री उदय सामंत *💫सिंधुदुर्गनगरी दि.२७-:* राज्यात इतर जिल्ह्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना स्थिती नियंत्रणात आहे. मात्र, जिल्ह्यातील जनतेने गाफील न राहता योग्य ती काळजी घ्यावी असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात कोरोनाविषयक प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि लसीकरण मोहिमेबाबतच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आ. वैभव नाईक,…

Read Full News

वन मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी कुडाळ महिला भाजपचे रास्ता रोको आंदोलन

*💫कुडाळ दि.२७-:* वन मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत आज भाजप महिला मोर्चाच्या वतीने कुडाळ येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर पाच दिवसात कारवाई न झाल्यास हजारो महिलांसह भव्य आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरेस यांनी यावेळी दिला आहे. यावेळी ठाकरे…

Read Full News

कार कलंडून अपघात…

९ जखमी *💫कणकवली दि.२७-:* समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचवताना कार रस्त्याबाहेर जाऊन कलंडून झालेल्या अपघातात 9 जण जखमी झाले. कणकवली – कनेडी मार्गावर हरकुळ बुद्रुक गावात काणेकर दुकानानजिक 27 फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अककरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. सर्व जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील काही जखमी भिरवंडे गावातील तर काही त्यांचे…

Read Full News

वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरा….

अन्यथा येत्या 23 मार्च रोजी तहसीलसमोर ग्रामस्थांसमवेत आमरण उपोषण;युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव यांचा जिल्हा शल्यचिकित्सकाना इशारा *💫वैभववाडी दि.२७-:* वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांची रिक्त पदे तसेच अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्तपदे तातडीने भरण्यात यावी. अन्यथा येत्या 23 मार्च रोजी तहसील कार्यालय वैभववाडी येथे ग्रामस्थांसमवेत आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव यांनी…

Read Full News

संत रविदासांचे विचार आचरणात आणावेत-:सुजित जाधव…

*💫कणकवली दि.२७-:* चर्मकार समाजाचे आराध्यदैवत संत रविदास यांचे समानता, सदभावना आणि करुणा या त्रिसुत्रीचे विचार अंमलात आणल्यास समस्त मानवजातीचे कल्याण होईल. सर्व मानवजातीने संत रविदास यांच्या मानवतेच्या विचारांनी जीवन जगावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांनी केले. कणकवली बाजारपेठेत चंद्रकांत भोसले यांच्या निवासस्थानी संत रविदास यांची जयंती मोठ्या भक्तिभावाने…

Read Full News

कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार द्या ; अन्यथा परिणाम भोगा…

शिवसेना नेते संदेश पारकर यांनी ठणकावले *💫कणकवली दि.२७-:* बिव्हिजि आणि क्रिस्टल कंपनीच्या पहारेकरी, सफाईगार आणि माळीकाम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे थकीत पगार त्वरित द्या अन्यथा कामगारांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनातून जिल्ह्यातील वसतिगृह बंद पडतील. त्याला ठेकेदार कंपनी जबाबदार राहील असा इशारा शिवसेना नेते संदेश पारकर यांनी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला. जिल्ह्यातील समाजकल्याण कार्यालय आणि वसतीगृहांत कंत्राटी सफाई…

Read Full News

कणकवली नगरपंचायतीत संत रविदास जयंती साजरी…

*💫कणकवली दि.२७-:* कणकवली नगरपंचायत मध्ये संत रविदास यांची जयंती साजरी करण्यात आली. नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते संत रविदास यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. संत रविदास यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयांत करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार नगरपंचायतमध्ये आज संत रविदास जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, आरोग्य सभापती अभि मुसळे, माजी उपनगराध्यक्ष…

Read Full News

नूतन विद्यालय कळणे येथे जागतिक मराठी भाषा दिवस साजरा…

*💫दोडामार्ग दि.२७ सुमित दळवी-:* साहित्यातील सर्वात श्रेष्ठ समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा २७ फ्रेब्रु.हा दिवस जागतिक मराठी भाषा दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो.दोडामार्ग तालुक्यातील नूतन विद्मालय कळणे या प्रशालेतही दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मुख्या.महेंद्र देसाई, शिक्षिका सौ.निकीता सावंत, संजय तायवाडे,संयोजक सतीश धर्णे आदी उपस्थित होते. यावेळी विद्मार्थांनी कुसुमाग्रजांच्या विविध कवितांचे…

Read Full News

*साटेली तर्फे सातार्डा गावचे विद्यमान सरपंच केशव जाधव यांचे निधन

*गोवा बांबुळी येथे सुरू होते उपचार *💫सावंतवाडी ता.दि.२७-:* साटेली तर्फे सातार्डा गावचे विद्यमान सरपंच केशव शंकर जाधव ( वय ५५) यांचे अल्पशा आजाराने गोवा बांबुळी येथे उपचार सुरू असताना निधन झाले आहे. गेले अनेक दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर गोवा बांबुळी येथे उपचार सुरू होते. परंतु आज उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे साटेली…

Read Full News

You cannot copy content of this page