*💫कुडाळ दि.२७-:* वन मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत आज भाजप महिला मोर्चाच्या वतीने कुडाळ येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर पाच दिवसात कारवाई न झाल्यास हजारो महिलांसह भव्य आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरेस यांनी यावेळी दिला आहे. यावेळी ठाकरे सरकारचा विरोधात जोरदार घोषणा देत निषेध करण्यात आला आहे.
वन मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी कुडाळ महिला भाजपचे रास्ता रोको आंदोलन
