९ जखमी
*💫कणकवली दि.२७-:* समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचवताना कार रस्त्याबाहेर जाऊन कलंडून झालेल्या अपघातात 9 जण जखमी झाले. कणकवली – कनेडी मार्गावर हरकुळ बुद्रुक गावात काणेकर दुकानानजिक 27 फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अककरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. सर्व जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील काही जखमी भिरवंडे गावातील तर काही त्यांचे नातलग आहेत. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत,पं स सदस्य मंगेश सावंत, भिरवंडे उपसरपंच नितीन सावंत यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली.