अन्यथा येत्या 23 मार्च रोजी तहसीलसमोर ग्रामस्थांसमवेत आमरण उपोषण;युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव यांचा जिल्हा शल्यचिकित्सकाना इशारा
*💫वैभववाडी दि.२७-:* वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांची रिक्त पदे तसेच अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्तपदे तातडीने भरण्यात यावी. अन्यथा येत्या 23 मार्च रोजी तहसील कार्यालय वैभववाडी येथे ग्रामस्थांसमवेत आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव यांनी निवेदनाद्वारे जिल्हा शल्यचिकित्सक सिंधुदुर्ग यांना दिला आहे. वैभववाडी तालुका हा दुर्गम तालुका असून तालुक्यातील गोरगरीब जनता ही शासकीय आरोग्य यंत्रणेवर अवलंबून आहे. मात्र गेले काही दिवस वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी डॉक्टर नाही.त्यामुळे रुग्णालयाला कोणीही वालीच नाही, अशी गंभीर परिस्थिती आहे. शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून अध्यावत ग्रामीण रुग्णालय बांधले आहे. मात्र रुग्णालयातील डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे यामुळे रुग्णालय कुचकामी ठरत आहे. त्यामुळे तालुक्यातील गोरगरीब जनतेची आरोग्याबाबत हेंडसाळ होत आहे. अपघात,सर्पदंश,गरोदर माता यांना वेळीच उपचार मिळत नाही. त्यामुळे रुग्णांच्या जीवावर बेतण्याची प्रसंग अनेक वेळा येतात. तरी रुग्णालयातील डॉक्टरांची रिक्त पदे व आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त तात्काळ करण्यात यावी. तसेच 108 रुग्णवाहिका वेळेत मदत मिळत नसल्यामुळे रुग्णांना तातडीने रुग्णालयात घेऊन जाता येत नाही. त्यासाठी खाजगी वाहनांची व्यवस्था करावी लागते.त्याबाबत नियोजन करण्यात यावे.येत्या तरी 15 दिवसाच्या आत भरण्यात रुग्णालयातील रिक्तपदे यावी.अन्यथा दिनांक 23 मार्च 2019 रोजी वैभववाडी तहसीलदार कार्यालयासमोर ग्रामस्थांना समवेत आमरण उपोषण करण्यात येईल. असा इशारा भालचंद्र जाधव यांनी दिला आहे. या निवेदनावर वैभववाडी तालुका सेवा संघाचे सरचिटणीस रवींद्र पवार महालक्ष्मी सेवा सोसायटी कोकिसरेचे चेअरमन श्रीराम शिंगरे ग्रा.पं. सदस्य कोळपे अनंत जाधव ,युवा कार्यकर्ते मंगेश वळंजू ,ज्येष्ठ कार्यकर्ते भगवान जाधव ,यांच्या सह्या आहेत.