संत रविदासांचे विचार आचरणात आणावेत-:सुजित जाधव…

*💫कणकवली दि.२७-:* चर्मकार समाजाचे आराध्यदैवत संत रविदास यांचे समानता, सदभावना आणि करुणा या त्रिसुत्रीचे विचार अंमलात आणल्यास समस्त मानवजातीचे कल्याण होईल. सर्व मानवजातीने संत रविदास यांच्या मानवतेच्या विचारांनी जीवन जगावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांनी केले. कणकवली बाजारपेठेत चंद्रकांत भोसले यांच्या निवासस्थानी संत रविदास यांची जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली. जिल्हाध्यक्ष सुजित जाधव, महानंदा चव्हाण यांच्या हस्ते संत रविदास यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. यावेळी जिल्हा सहसचिव अनिल चव्हाण, सिं.च.स.उ.मं. शाखा कणकवलीचे सचिव आनंद जाधव, माजी तालुकाध्यक्ष सुधीर जाधव, शरद जाधव, चंद्रकांत भोसले, महेंद्र चव्हाण, हेमंत चव्हाण, यशवंत भोसले, तांबोळकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page