⚡मालवण ता.१३-:
मालवण तालुक्यातील पोईप येथील वरची पालव वाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला अनिल लक्ष्मण नाईक व नितीन लक्ष्मण नाईक यांनी आपले वडील कै. लक्ष्मण नाईक यांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरची पालव वाडी शाळेला प्रिंटर भेट देऊन प्रशालेच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी योगदान दिले आहे. अशाच प्रकारे या पुर्वी ही पोईप वर्दम हायस्कूल , प्राथमिक शाळा पोईप येथे संगणक व शैक्षणिक क्रीडा साहित्य भेट दिले आहेत. नितीन नाईक यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर १ या प्रशालेसाठी संगणक व प्रिंटर देण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी पोईप विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष शंकर ( बाळा ) पालव, सेवा निवृत्त शिक्षक नरेश पालव, देवस्थान मानकरी परशुराम नाईक, देऊ ( बबन ) नाईक, गुरुनाथ पालव, अनिल पालव, अस्मित पालव, हेमंत पालव व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.अनिल नाईक आणि नितीन नाईक यांच्या या आदर्श उपक्रमाचे कौतुक करीत उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
