मेढा काळबादेवी मार्गावरील निकृष्ट काँक्रिट कामावर ठेकेदाराला नोटीस…

⚡मालवण ता.१३-:
मालवण शहरातील मेढा काळबादेवी मंदिर मार्गांवर करण्यात आलेले रस्ता काँक्रिटिकरणाचे काम निकृष्ट झाल्याची तक्रार नगरपालिकेचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी केल्यानंतर आज श्री बापर्डेकर यांनी उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, नगरसेवक महेश कांदळगांवकर व नगरसेविका मेघा सावंत यांच्या समवेत प्रत्यक्ष पाहाणी केली. मेढा काळबादेवी मंदिर मार्गांवरील काँक्रिट मार्गावरील सर्व ठिकाणी
काँक्रिट उखडले असून धुळीचे साम्राज्य पसरल्याचे निदर्शनास येताच श्री बापर्डेकर यांनी संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावून पुन्हा दर्जेदार पद्धतीने काँक्रिटिकरण करण्याचे आदेश बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी बांधकाम प्रशासनास दिले आहेत.

मालवण शहरातील मेढा काळबादेवी मंदिर मार्गांवरील हे काम निवडणुकीपूर्वी करण्यात आले. अवघ्या काही महिन्यात
काँक्रिट उखाडले. या मार्गांवरून वाहने गेल्यानंतर पुर्ण सिमेंट माती उडून धुळीचे साम्राज्य पसरत आहे. याठिकाणी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत प्राप्त तक्रारीनुसार बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, नगरसेविका मेघा सावंत, नगरसेवक महेश कांदळगावकर, पालिका अभियंता राजा केरिपाळे आदी उपस्थित होते.

लाखो रुपये खर्च करून केलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असेल तर अशा कामांचा उपयोग काय? कामे होत असताना प्रशासनाने या कामांवर योग्य पद्धतीने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. निकृष्ट कामे होत असतील तर जनतेला सुविधा मिळणार कशा? अश्या स्वरूपात स्पष्ट नाराजी व्यक्त करतं या संबंधित कामाच्या ठेकेदाराला तात्काळ नोटीस काढून योग्य पद्धतीने काम पूर्ण करून घ्यावे. असे आदेश बांधकाम सभापती सहदेव बार्डेकर यांनी दिले आहेत.

शहरातील सर्व कामांची पाहणी केली जाईल. काम दर्जेदार असले पाहिजे. निकृष्ट कामे आढळल्या अशा ठेकेदारांना काळा यादीत टाकण्याबाबतही निर्णय घेतला जाईल. जनतेच्या पैशातून जनतेसाठी होणारी कामे ही दर्जेदारच असली पाहिजे हीच आमची भूमिका आहे. असे सहदेव बापर्डेकर यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत प्रशासनाला पुढील कार्यवाही तात्काळ करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.

You cannot copy content of this page