कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार द्या ; अन्यथा परिणाम भोगा…

शिवसेना नेते संदेश पारकर यांनी ठणकावले

*💫कणकवली दि.२७-:* बिव्हिजि आणि क्रिस्टल कंपनीच्या पहारेकरी, सफाईगार आणि माळीकाम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे थकीत पगार त्वरित द्या अन्यथा कामगारांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनातून जिल्ह्यातील वसतिगृह बंद पडतील. त्याला ठेकेदार कंपनी जबाबदार राहील असा इशारा शिवसेना नेते संदेश पारकर यांनी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला. जिल्ह्यातील समाजकल्याण कार्यालय आणि वसतीगृहांत कंत्राटी सफाई कामगार, माळी आणि पहारेकरी कर्मचारी पुरविण्याचा ठेका बिव्हिजि आणी क्रिस्टल कंपनीकडे आहे. ऑक्टोबर 2020 पासून या कर्मचाऱ्यांचे मानधन देण्यात आलेले नाही. त्यामुळे 16 फेब्रुवारीपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. याची दखल शिवसेना नेते संदेश पारकर यांनी घेतली. कणकवलीतील मुलींच्या वसतीगृहातील आंदोलनकर्त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कर्मचाऱ्यानी आपल्या मागण्यांचे निवेदन पारकर यांना दिले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव, कणकवली शहराध्यक्ष शेखर राणे, निसार शेख, संजय पाटकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page