*💫दोडामार्ग दि.२७ सुमित दळवी-:* साहित्यातील सर्वात श्रेष्ठ समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा २७ फ्रेब्रु.हा दिवस जागतिक मराठी भाषा दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो.दोडामार्ग तालुक्यातील नूतन विद्मालय कळणे या प्रशालेतही दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मुख्या.महेंद्र देसाई, शिक्षिका सौ.निकीता सावंत, संजय तायवाडे,संयोजक सतीश धर्णे आदी उपस्थित होते. यावेळी विद्मार्थांनी कुसुमाग्रजांच्या विविध कवितांचे वाचन केले.श्री.धर्णे यांनी यावेळी मराठी भाषा दिनाचे महत्व विद्मार्थांना सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन विद्मार्थांनीच केले.
नूतन विद्यालय कळणे येथे जागतिक मराठी भाषा दिवस साजरा…
