⚡वेंगुर्ला ता.१३-: राज्य सरकारतर्फे परदेश दौऱ्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 5 प्रगतशील शेतकऱ्यांची निवड करण्यात आली होती. यामध्ये निरवडे ( ता. सावंतवाडी ) येथील प्रगतशील शेतकरी प्रणव आत्माराम नाडकर्णी हे मलेशिया, व्हिएतमान, फिलिपाईन्स या देशामध्ये अभ्यास दौऱ्यासाठी गेल्याबद्दल त्यांचा वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्र येथे आज शुक्रवारी सिंधुदुर्ग आंबा – काजू शेतकरी बागायतदार संघटना व छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा शेतकरी संघटना यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी सिंधुदुर्ग आंबा – काजू शेतकरी बागायतदार
संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयप्रकाश चमणकर, प्रगतशील शेतकरी प्रकाश गडेकर, ऍड. प्रकाश बोवलेकर,तालुका कृषी अधिकारी प्रकाश मोहिते, प्रफुलचंद्र उर्फ बाळू परब, चंद्रशेखर देसाई, श्री. पै, छत्रपती संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर राय, कुमा ठाकूर, सुरेश धुरी, स्वप्नील शिरोडकर, विलास ठाकूर, बाळू धुरी, किशोर नरसुले, वीरेंद्र कामत – आडारकर, वृषाल ठाकूर, रामचंद्र मांजरेकर, बळीराम प्रभू, बाबा वराडकर, श्रीहरी नाईक, रामकृष्ण बावकर आदीसह तालुक्यातील – जिल्ह्यातील आंबा – काजू बागायतदार शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निरवडे येथील प्रगतशील शेतकरी प्रणव नाडकर्णी यांचा वेंगुर्ला येथे सत्कार…
