शिंदे सेनेला मोठा धक्का, सचिन वालावलकर यांचा पदाचा राजीनामा…

⚡वेंगुर्ला ता.१३-: शिवसेना जिल्हा समन्वयक व आमदार दिपक केसरकर यांचे कट्टर समर्थक सचिन गुरुनाथ वालावलकर यांनी आज शुक्रवारी आपल्या शिवसेना पदाचा राजीनामा दिला आहे.आज वेंगुर्ला येथील मासिक सभेत त्यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे वेंगुर्ला शहर, तालुक्यासह जिल्ह्यात राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. वेंगुर्ला जि. प. व पंचायत समिती निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले आहे, त्यात त्यांचाही मोठा रोल राहिला आहे. त्यांच्या अचानक राजीनामा घोषणेमुळे पदाधिकारी, शिवसैनिक यांच्यात एकच अस्वस्थता पसरली आहे. नगरपरिषदेत शिवसेनेला जरी अपयश आले असले तरी तत्पूर्वीच्या 4 वर्षाच्या कालावधीत त्यांनी वेंगुर्ला शहर विकासासाठी आ. दिपक केसरकर यांच्या माध्यमातून सुमारे 140 कोटी विकासनिधी आणला आहे. त्यांच्या या भूमिकेने निकटवरतीय यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा, असा सुर शहरातून व्यक्त करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page