⚡ सावंतवाडी, ता.१३ : भारतीय जनता पार्टीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मिळवलेल्या दणदणीत यशानंतर येथील पदाधिकाऱ्यांनी रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीत सावंतवाडीचे भाजप युवा नेते विशाल परब, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, नवनिर्वाचित जि.प. सदस्य संदीप गावडे, पं.स. सदस्य गौरव मुळीक, युवा नेते व संघटक विनोद राऊळ तसेच समीर नेमळेकर आदी उपस्थित होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत तळागाळातील लोकांपर्यंत विकासकामे पोहोचवावीत, संघटनेची ताकद वाढवावी आणि जनसेवा हेच ध्येय ठेवून काम
करावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
भारतीय जनता पार्टीचा नावलौकिक अधिक वृद्धिंगत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
