Headlines

Global Maharashtra Breaking News

मळेवाड विविध कार्य.सहकारी सेवा संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित १४ रोजी विविध कार्यक्रम…

⚡सावंतवाडी ता.१२-:मळेवाड विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. मळेवाड या संस्थेला ७५ वर्षे पूर्ण झाली असून , या निमित्ताने शनिवार दिनांक १४ मार्च रोजी “अमृत महोत्सवी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त संस्थेच्या कार्यालयात सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे तसेच सायंकाळी ६ वा.पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यात,दीपप्रज्वलन ,प्रास्ताविक…

Read Full News

सावंतवाडी लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी सुधीर आडिवरेकर यांची नियुक्ती…

सावंतवाडी ता.१२-: जिल्हा गव्हर्नर डॉ. वीरेंद्र जी चिखले यांच्या उपस्थितीत सावंतवाडी लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.यामध्ये अध्यक्षपदी लायन सुधीर आडीवरेकर यांची निवड करण्यात आली. तसे इतर पदाधिकाऱ्यांचे देखील यावेळी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आलेअसून आगामी काळात क्लबच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Read Full News

आंबा- काजू पिकाच्या नुकसानीवर सरकार गंभीर;नुकसान भरपाई देणार…

कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे यांचा विश्वास.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१२-:बागायतदार शेतकरी ही माझी जनता आहे. ते रस्त्यावर असताना मी अधिवेशनात बसू शकत नाही! सरकार म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत आपल्या मोर्चास सामोरे आलो आहे. आंबा आणि काजू पिकाचे यावर्षी मोठे नुकसान झाले आहे. माझ्या सूचनेनंतर ९० टक्के नुकसान झाल्याचा सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल शासनाकडे तातडीने सादर…

Read Full News

नेमळे हायस्कूल समोरील त्या धोकादायक रस्त्यावर संदिप गावडे यांच्या माध्यमातून स्पिडब्रेकर बसविण्याचे काम पूर्ण…

उपसभापती गौरव मुळीक व भाजपा नेमळे यांचा विशेष पुढाकार.. ⚡सावंतवाडी ता.१२-: नेमळे हायस्कूल समोरील महामार्गावरून अनेक अवजड वाहने तसेच इतर वाहनांची वरदळ सुरू असते विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या मार्गावर स्पिडब्रेकर असणे आवश्यक आहे अशी मागणी शिक्षक, पालक तसेच ग्रामस्थ यांच्यामध्यामातून काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. ही मागणी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हापरिषद सदस्य संदिप गावडे…

Read Full News

मुंबई-गोवा महामार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक…

दुपारी सव्वा बाराची घटना: युवक गंभीर. बांदा/प्रतिनिधी. मुंबई गोवा महामार्गावर सावली हॉटेल नजीक दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात युवक गंभीर जखमी झाला आहे. तर दुसऱ्या दुचाकीवरील दोन महाविद्यालयीन विद्यार्थी जखमी झाले आहेत. हा अपघात आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास झाला. सर्व जखमीना स्थानिकांनी उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. बांदा पोलीस…

Read Full News

सावंतवाडीत घे भरारी फाऊंडेशनतर्फे महिला दिन साजरा…

महिलांचा सन्मान : दशावतारी नाट्यप्रयोगास उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡सावंतवाडी ता.१२-: जागतिक महिला दिनाच्या औचित्याने ‘घे भरारी फाऊंडेशन’, सावंतवाडीने येथील जगन्नाथराव भोसले उद्यानात आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांचा, दिव्यांग मुलांचा गौरव, मजेशीर खेळ, झटपट प्रश्न, दशावतारी नाट्यप्रयोगाने कार्यक्रम उत्तरोत्तर बहारदार होत गेला. साहस प्रतिष्ठान संचलित दिव्यांग विकास केंद्रातील चिमुकल्या मुलांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन…

Read Full News

बांद्यातील कल्पना ट्रेडर्सला मध्यरात्री भीषण आग; पटेल बंधूंचे लाखोंचे नुकसान…

⚡बांदा ता.१२-: बांदा शहरातील दोडामार्ग रस्त्यावरील गडगेवाडी येथे असलेल्या कल्पना ट्रेडर्स या दुकानाला मंगळवारी मध्यरात्री भीषण आग लागून पटेल बंधू यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची घटना घडली.आगीची माहिती मिळताच सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ आणि दोडामार्ग येथील अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करत…

Read Full News

मातोंड येथे गवारेड्याची चारचाकी वाहनाला धडक…

वेंगुर्ला तालुक्यात गवारेड्यांच्या दहशतिने नागरिक भयभीत.. ⚡वेंगुर्ला ता.११-: वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथे सोमवारी रात्री गवारेड्यानी दोन वाहनाला धडक दिल्याने चारजण जखमी होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले होते. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी रात्री मातोंड हायस्कुल नजिक कौस्तुभ सुनील शिंदे रा. मातोंड यांच्या वाहनाला (टेम्पो क्र. MH-07-AJ -1663) धडक दिल्याने वाहनाचे दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले…

Read Full News

वन्यप्राणी अपघात प्रकरणी नुकसानभरपाईच्या जीआरमध्ये सुधारणा करावी…

वनसंरक्षण समित्यांनी शासनाकडे पाठपुरावा करावा;माजी सरपंच विजय रेडकरांची मागणी.. ⚡वेंगुर्ला ता.११-: वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथे गवारेड्यांच्या धडकेत सोमवारी रात्री दोन वाहनांचे नुकसान होते तर चौघे जखमी झाले होते.वन्यप्राण्यांच्या बाबतीत संरक्षणासाठी संबंधित गावातील “वनसंरक्षण समिती “ने ठराव घेऊन शासन स्तरावर वेळीवेळी पाठपुरावा करणे आवश्यक आहे, असेयाबाबत बोलताना तुळस माजी सरपंच विजय रेडकर यांनी सांगितले.श्री रेडकर बोलताना…

Read Full News

शिमगोत्सवात नावळेतील विद्यार्थ्यांचे पारंपरिक गोप नृत्य रंगले…

⚡वैभववाडी ता.११-: वैभववाडी तालुक्यातील नावळे गावचे ग्रामदैवत श्री भगवती देवी शिमगावत्सव निमित्त होळीच्या माडावर जि प विद्या मंदिर नावळे धनगरवाडा विद्या मंदिर नावळे नंबर 1 विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी गोप नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले उपस्थित रसिकांनी विद्यार्थ्यांच्या ह्या कलेला दात देत बक्षिसांची उधळण केली हे गोप नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम मुख्याध्यापक संतोष भरडकर…

Read Full News

You cannot copy content of this page