⚡सावंतवाडी ता.१२-:
मळेवाड विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. मळेवाड या संस्थेला ७५ वर्षे पूर्ण झाली असून , या निमित्ताने शनिवार दिनांक १४ मार्च रोजी “अमृत महोत्सवी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त संस्थेच्या कार्यालयात सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे तसेच सायंकाळी ६ वा.पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यात,दीपप्रज्वलन ,प्रास्ताविक पाहुण्यांचे स्वागत ,संस्थेचे माजी चेअरमन यांचे सत्कार, नियमित परतफेड कर्जदार शेतकरी सभासद बांधवांचा सत्कार ,मळेवाड कोंडूरे गावातील इयत्ता दहावी – बारावी मधील सन २०२५ या कालावधीत एक ते तीन क्रमांकावर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार, मळेवाड कोंडूरे गावातील माजी सैनिकांचा सत्कार तसेच सायंकाळी ७:०० वाजता बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळ ,चेंदवण यांचा नाट्यप्रयोग होणार असून या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून (माजी शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य )आमदार दीपक केसरकर ,सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष मनीष दळवी, संचालक सिंधुदुर्ग बँक विद्याधर परब, (माजी नगराध्यक्ष सावंतवाडी) सच्चिदानंद (संजू)परब, जि प सदस्य अपर्णा सातोस्कर , सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सावंतवाडी सुजय कदम , तालुका खरेदी विक्री सावंतवाडी अध्यक्ष प्रमोद गावडे ,विशाल परब, पंचायत समिती सदस्य धनश्री मराठे ,पंचायत समिती सदस्य शरद भाऊसकर, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सिंधुदुर्ग माणिक सांगळे, चेअरमन प्रकाश पार्सेकर व्हाईस. चेअरमन प्रकाश राऊत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून,सदरील कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मळेवाड विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
मळेवाड विविध कार्य.सहकारी सेवा संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित १४ रोजी विविध कार्यक्रम…
