वनसंरक्षण समित्यांनी शासनाकडे पाठपुरावा करावा;माजी सरपंच विजय रेडकरांची मागणी..
⚡वेंगुर्ला ता.११-: वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथे गवारेड्यांच्या धडकेत सोमवारी रात्री दोन वाहनांचे नुकसान होते तर चौघे जखमी झाले होते.
वन्यप्राण्यांच्या बाबतीत संरक्षणासाठी संबंधित गावातील “वनसंरक्षण समिती “ने ठराव घेऊन शासन स्तरावर वेळीवेळी पाठपुरावा करणे आवश्यक आहे, असे
याबाबत बोलताना तुळस माजी सरपंच विजय रेडकर यांनी सांगितले.
श्री रेडकर बोलताना म्हणाले ,वेंगुर्ला तुळसमार्गे घाटी एरिया ते सावंतवाडी हा अपघातप्रवण क्षेत्र आहे. मठ – तुळस वनक्षेत्र तसेच तुळस जकातनाका घाटी ते वेंगुर्ला आंगचेकर घर पर्यंतच्या भागात बिबट्या, गवारेडे व अन्य जंगली प्राण्याचा वावर आहे. या भागात स्ट्रीटलाईट्स ची गरज आहे. याबाबत ग्रामीण स्तरावरून तरतूद होत नसेल तर वनविभागाने सोलार लॅम्प बसवावेत. या एरियात बहुसंख्य बागायतदार – शेतकरी असल्याने तसेच वाहतुकीचा महत्वाचा मुख्य मार्ग असल्याने वनविभागाने अथवा शासनाने विशेष तरतूद करणे आवश्यक आहे. आज जर गवारेडे हा वन्यप्राणी रस्ता क्रॉस करताना अपघात होऊन जर नुकसानभरपाई मिळणार नसेल तर काय उपयोग? याबाबतच्या जीआर मध्ये वनविभाग शासनाने सुधारणा करण्यात यावी. शेतकरी – वाहनचालक यांचा जीव महत्वाचा असून दुर्दैवाने रस्त्यावर मनुष्यावर हल्ला झाल्यास नुकसानभरपाई मिळणे आवश्यक आहे. वन्यप्राण्यांच्या बाबतीत संरक्षणासाठी संबंधित गावातील ” वनसंरक्षण समिती “ने ठराव घेऊन शासन स्तरावर वेळीवेळी पाठपुरावा करणे आवश्यक आहे, तेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने हिताचे ठरणार आहे, असे यावेळी तुळस माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते विजय रेडकर यांनी बोलताना दिली. वन्यप्राणीद्वारे रस्ते अपघात झाल्यास वनविभाग पंचनामा करणार. परंतु वाहनाचा अपघात झाल्यास त्यांना नुकसानभरपाई साठी पंचनामा हा घटक महत्वाचा ठरतो. याबाबत सोमवारी रात्री रस्ता अपघात असल्याने रस्ता सुरक्षा पोलीस पंचनामा व वन्यप्राणी वनविभाग पंचनामा करण्याची मागणी शेतकरी विजय रेडकर यांनी केली होती. तसेच ग्रामस्थांनी जखमीना तात्काळ किमान वीस हजार तात्काळ आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी केली होती . परंतु संबंधित बाबतीत तरतूद नसल्याचे वनविभाग आरएफओ यांनी सांगितले. त्यामुळे सोमवारी तुळस मुख्य रस्त्यावर झालेल्या वन्यप्राणी – वाहने विचित्र अपघातामुळे तुळस एरियात तसेच तालुक्यात शासनाने रस्ता अपघात नुकसानभरपाई बाबत जीआर सुधारणा करण्याची मागणी व्यक्त करण्यात आली आहे.
