Headlines

Global Maharashtra Breaking News

शिवसेना ओ.बी.सी. जिल्हाप्रमुख पदी रुपेश पावसकर यांची नियुक्ती

*💫सावंतवाडी दि.१६-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिवसेना ओ.बी.सी जिल्हाप्रमुख पदी रुपेश पावसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र कुडाळ मालवण चे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते देण्यात आले आहे.

Read Full News

…अन्यथा तुम्हाला कार्यालयात बसू देणार नाही

राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचा आगार प्रमुखांना इशारा* *💫सावंतवाडी दि.१६-:* राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यानी आज पुन्हा एकदा सावंतवाडी बस स्थानकास भेट देत आगर प्रमुख वैभव पडोळे यांना घेराव घालत बस स्थानकावर निर्माण झालेल्या विविध समस्यांबाबत जाब विचारला आहे. यावेळी बस स्थानकावर सुरू असलेल्या अनागोंदी कारभारामुळे आगार प्रमुख वैभव पडोळे यांना तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी धारेवर…

Read Full News

मराठी भाषिक नागरिकांना मारहाण प्रकरणी सावंतवाडीत निषेध आंदोलन

सीमा भागामध्ये कन्नड भाषिक संघटना कडून मराठी भाषिक नागरिकांवर अन्याय *💫सावंतवाडी दि.१६-:* सीमा भागामध्ये कन्नड भाषिक संघटना कडून मराठी भाषिक नागरिकांना मारहाण करत दहशत माजवण्याचा प्रकार सुरू असून, या प्रकाराचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती सिंधुदुर्गच्या वतीने आज सावंतवाडी येथे शिवाजी चौकात समितीचे जिल्हाध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

Read Full News

विलवडे ग्रामपंचायतच्या डाटा ऑपरेटरचे आकस्मिक निधन…

विलवडे गावावर पसरली शोककळा *💫बांदा दि.१६-:* विलवडे – टेंबवाडी येथील कृष्णा सोमा सावंत (३०) या युवकाचे बांबोळी येथे उपचारादरम्यान सोमवारी रात्री उशिरा निधन झाले. कृष्णाला सहा दिवसांपूर्वी उलट्या होत असल्याने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा त्रास कमी होत नसल्याने अधिक उपचारासाठी सावंतवाडी येथील खासगी दवाखान्यात हलविण्यात आले होते. मात्र, तरीही…

Read Full News

अभ्यासक्रम, नोकरी व व्यवसाय संधीसाठी जागृती

शासकीय तंत्रनिकेतन मालवणकडून ‘स्कूल कनेक्ट २१’ उपक्रम *💫मालवण दि.१५-:* अभ्यासक्रम नोकरी व व्यवसाय संधींवर जागृती होण्याच्या उद्देशाने शासकीय तंत्रनिकेतन मालवण कडून स्कूल कनेक्ट २१ हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. याद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील विविध शाळांमधील दहावीच्या व बारावीच्या विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षणाचे महत्व व फायदे आणि त्या अनुषंगाने उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्या व व्यवसायाच्या संधी या बद्दल माहिती…

Read Full News

परराज्यातील ‘त्या’ ट्रॉलर्स विरोधात वेंगुर्ला पोलिसांत गुन्हा दाखल

सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयाच्या गस्ती नौकेला आडकाठी प्रकरण : मुरारी भालेकर यांनी केली तक्रार *💫मालवण दि.१५-:* सिंधुदुर्गच्या समुद्रात बेकायदेशीर मच्छीमारी करणाऱ्या परराज्यातील ट्रॉलर्सवर कारवाई करण्यास गेलेल्या सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयाच्या गस्ती नौकेला आडकाठी केल्याप्रकरणी परराज्यातील त्या सहाही ट्रॉलर्स विरोधात वेंगुर्ला पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहाय्यक मत्स्य व्यवसाय कार्यालयाचे परवाना अधिकारी मुरारी…

Read Full News

कुंभारमाठमध्ये आरोग्य अधिकाऱ्यांचा सन्मान

खासदार विनायक राऊत यांचा वाढदिवस साजरा : मालवण शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची संकल्पना *💫मालवण दि.१५-:* खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण तालुक्यातील आरोग्यसेवक, आरोग्यसेविका तसेच आशा स्वयंसेविका यांचा शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या संकल्पनेतून आज कुंभारमाठ येथे सत्कार करण्यात आला. यावेळी हरी खोबरेकर यांनी कोरोनाच्या काळात आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका तसेच आरोग्य सेवक यांनी…

Read Full News

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी संशयित आरोपीचा जामीन नामंजूर

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१५-:* अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या देवगड येथील संशयित आरोपीचा जामीन अर्ज आज जिल्हा व सत्र न्यायलयाने नामंजूर केला आहे. याकामी जिल्हा सहाय्यक सरकारी वकील अँड रुपेश देसाई यांनी काम पाहिले आहे.

Read Full News

अमोल गावडेंच्या प्रामाणिकपणामुळे सोनसाखळी मुळ मालकाला परत

सुनीता कारेकर मुळ मालक पोलिसांच्या माध्यमातून केली परत:गावडें यांचे होतेय सर्वत्र अभिनंदन *💫सावंतवाडी दि.१५-:* सोनुर्ली येथील अमोल गावडे या युवकाला सापडलेली ती सोन साखळी पोलिसांनी ओळख पटवुन अखेर मालकाच्या ताब्यात दिली. सुनिता मोहन कारेकर रा. माजगाव कासारवाडी या महिलेची ती साखळी होती. तिने साखळी परत केल्याबद्दल अमोल याचे आभार व्यक्त केले. सावंतवाडी येथे बाजारात आलेल्या…

Read Full News

एलईडी मासेमारी बंद करा, अन्यथा कार्यालयात साफ सोडणार

कारवाईला घाबरत नाही भाजपनेते नीलेश राणेंचा इशारा मालवण दि प्रतिनिधी-: सागरी हद्दीत परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सची घुसखोरी सुरू असून बंदी असतानाही एलईडी दिव्यांच्या सहाय्याने मासेमारी केली जात आहे. त्यामुळे स्थानिक पारंपरिक मच्छीमारांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने परप्रांतीयांचे अतिक्रमण रोखण्याबरोबरच एलईडीची मासेमारी बंद न केल्यास कार्यालयात साप सोडण्यास मागे पुढे पाहणार नाही. आमच्यावर खुशाल…

Read Full News

You cannot copy content of this page