राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचा आगार प्रमुखांना इशारा*
*💫सावंतवाडी दि.१६-:* राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यानी आज पुन्हा एकदा सावंतवाडी बस स्थानकास भेट देत आगर प्रमुख वैभव पडोळे यांना घेराव घालत बस स्थानकावर निर्माण झालेल्या विविध समस्यांबाबत जाब विचारला आहे. यावेळी बस स्थानकावर सुरू असलेल्या अनागोंदी कारभारामुळे आगार प्रमुख वैभव पडोळे यांना तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी धारेवर धरले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले होते. यावेळी योग्य ती कार्यवाही न झाल्यास आगर प्रमुख वैभव पडोळे यांना त्यांच्या कार्यालयात बसायला देणार नाही असा इशारा तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी दिला आहे. यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवा टेंमकर, हिदायतुल्ला खान, प्रसाद दळवी, आशिष कंदम, शफिक खान, जावेद शेख, आसिफ शेख ,राजू धारपवार, पप्पू शेख,सुरेश वडार,संतोष जोईल,कौतुक नाईक,नवल साटेलकर ,अमर धोत्रे,भरत गावकर,संकेत शेटकर असीम वागळे, नितीन सातपुते, इफतेकार राजगुरू, आदी उपस्थित होते.
