कुंभारमाठमध्ये आरोग्य अधिकाऱ्यांचा सन्मान

खासदार विनायक राऊत यांचा वाढदिवस साजरा : मालवण शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची संकल्पना

*💫मालवण दि.१५-:* खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण तालुक्यातील आरोग्यसेवक, आरोग्यसेविका तसेच आशा स्वयंसेविका यांचा शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या संकल्पनेतून आज कुंभारमाठ येथे सत्कार करण्यात आला. यावेळी हरी खोबरेकर यांनी कोरोनाच्या काळात आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका तसेच आरोग्य सेवक यांनी लाख मोलाची भूमिका बजावली. कोरोना काळात तुम्ही जे कार्य केले आहे या कार्याचे कुठेतरी कौतुक व्हावे यासाठी खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम पेंडूर, पोईप, मसुरा, आचरा आणि हिवाळे या सहाही विभागामध्ये करण्यात येणार असल्याचे खोबरेकर म्हणाले. यावेळी शिवसेना महिला संघटक प्रियांका रेवंडकर, वायरी भूतनाथ प. स. सदस्य मधुरा चोपडेकर, माजी सरपंच साक्षी लुडबे, उपविभाग प्रमुख अनिल केळुसकर, आरोग्य सहाय्यक आर. एस. रणसिंग आबा केळुसकर, राजम, निलेश केळुसकर, सदानंद करंगुटकर, भगवान लुडबे, सचिन मालवणकर, स्वामीदास शिरोडकर, प्रसाद आडवलकर, रमेश कद्रेकर, अक्षय भोसले रमेश मेस्त्री व इतर कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश मेस्त्री यांनी केले.

You cannot copy content of this page