वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायत मार्फत महात्मा गांधी जयंती व स्वच्छता पंधरवडा निमित
स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने वैशिष्ट्यपूर्ण
“बोलक्या भिंती” रंगभरण जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून स्वच्छता, स्वच्छ परिसर, प्लास्टिकमुक्ती, कचरा व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन व नागरिकांमध्ये स्वच्छतेची जनजागृती करणारे संदेश भिंतीवर आकर्षक पद्धतीने रंगविणे आवश्यक आहे. यासाठी प्रथम पारितोषिक 10 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक 5 हजार रुपये,
तृतीय पारितोषिक 2,500 रुपये,vचतुर्थ
पारितोषिक 2,500 रुपये देण्यात येणार असुन या
स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून स्पर्धा शुल्क पूर्णपणे माफ असणार आहे. ही
स्पर्धा गुरुवार दि. 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरु होणार असुन
नाव नोंदणी
सोमवार दि.12 ऑक्टोबर पर्यत संध्याकाळी 4 वाजेपर्यत करणे आवश्यक आहे.नाव नोंदणीसाठी ग्रामपंचायतशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील कलाकार, विधार्थी, कला संस्था तसेच स्वच्छता व पर्यावरण विषयावर काम करणान्या इच्छुकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन वायंगणी सरपंच अवी दुतोंडकर व वायंगणी ग्रामपंचायत यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

