विलवडे ग्रामपंचायतच्या डाटा ऑपरेटरचे आकस्मिक निधन…

विलवडे गावावर पसरली शोककळा

*💫बांदा दि.१६-:* विलवडे – टेंबवाडी येथील कृष्णा सोमा सावंत (३०) या युवकाचे बांबोळी येथे उपचारादरम्यान सोमवारी रात्री उशिरा निधन झाले. कृष्णाला सहा दिवसांपूर्वी उलट्या होत असल्याने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा त्रास कमी होत नसल्याने अधिक उपचारासाठी सावंतवाडी येथील खासगी दवाखान्यात हलविण्यात आले होते. मात्र, तरीही त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने अधिक उपचारासाठी बांबोळी येथे नेण्यात आले होते. तेथेही त्याची प्रकृती उपचारांना साथ देत नव्हती. अखेर सोमवारी रात्री उशिरा त्याची प्राणज्योत मालवली. कृष्णा सावंत हा विलवडे ग्रामपंचायत कार्यालयात डाटा ऑपरेटर म्हणून कार्यरत होता. मितभाषी, प्रामाणिक व कष्टाळू युवक अशी परिसरात त्याची ओळख होती. त्याच्या मृत्यूची बातमी समजतात विलवडे गावावर शोककळा पसरली. गावातील माजी उपसभापती विनायक दळवी, परेश दळवी यांनी गोवा बांबोळीत धाव घेतली. आज मंगळवारी सकाळी त्याच्या मृतदेहावर अंत्यविधी होणार आहेत. कृष्णाच्या आजाराचे नेमके निदान समजू शकले नाही. त्याच्या पश्चात आई, दोन भाऊ, बहिण असा परिवार आहे.

You cannot copy content of this page