Headlines

Global Maharashtra Breaking News

*आयुर्वेदिक महाविद्यालयात ३३ बेडचे कोव्हिड केअर सेंटर होणार सुरू

आमदार दिपक केसरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती* *💫सावंतवाडी दि.१४-:* सावंतवाडी येथील आयुर्वेदिक महाविद्यालयात ३३ बेडचे कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आमदार दिपक केसरकर यांनी झूम ऍप द्वारे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. तसेच लसीकरण सुरू असलेल्या उपकेंद्रावर नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी १ गाडी उपलब्ध करून दिली जाणार असून, येत्या ३-४…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ५५ रूग्ण सापडले

शहरात १२ तर ग्रामीणात ४३ *💫सावंतवाडी दि.१४-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ५५ रुग्ण सापडले असून, शहरात १२ तर ग्रामीण भागात ४३ रुग्ण सापडले आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात उभाबाजार २, लाखेवस्ती २, भटवाडी २, मोरडोंगरी १, जस्तीन नगर १, सावंतवाडी १, सालईवाडा ३, तर ग्रामीण भागात कलबिस्त…

Read Full News

बाळा आकेरकर मित्रमंडळाची सविता आश्रमाला जीवनाआवश्यक साहीत्याची मदत…

*💫बांदा दि.१४-:* येथील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या बाळा आकेरकर मित्रमंडळाच्या वतीने कुडाळ येथील सविता आश्रमाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जीवनावश्यक साहित्य देण्यात आले. मित्रमंडळाकडून कोरोना कार्यकाळात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. सविता आश्रमाचे व्यवस्थापक श्री. सावंत यांनी साहित्य स्वीकारले व बाळा आकेरकर मित्रमंडळाचे आभार व्यक्त केले. यावेळी जीवनावश्यक साहित्याबरोबरच वाफ घेण्याची मशीन व…

Read Full News

शिवराज्याभिषेक निमित्त ६ जून रोजी रक्तदान शिबिर

मनसे सावंतवाडी व सह्याद्री प्रतिष्ठानचे आयोजन 💫 *सावंतवाडी दि.१४-:* महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकसोहळा दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक ६जून २०२१रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा सावंतवाडी व सह्याद्री प्रतिष्ठान विभाग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. हे शिबीर ६जून दिवशी सावंतवाडी तालुक्यातील मळगाव हायस्कूल मळगाव येथे सकाळी ९.०० ते दुपारी…

Read Full News

शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने कुडाळ येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

३३ रक्तदात्यांनी केले रक्तदान_ *💫कुडाळ दि.१४-:* शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने आज शुक्रवार दिनांक १४ मे २०२१ रोजी धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री देव मारुती मंदिर धर्मशाळा, बाजारपेठ, कुडाळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये तरुण युवक, प्रतिष्ठित नागरिक, लोकप्रतिनिधी मिळून ३३ जणांनी रक्तदान केले. शिबिराची सुरुवात शंभुवंदना म्हणून झाली. यावेळी अंकुर सिड्स प्रा….

Read Full News

खैदा कातवड येथील सुरेश परब यांचे निधन

*💫मालवण दि.१४-:* मालवण खैदा कातवड येथील रहिवासी सुरेश बाबू परब वय ६७ यांचे नुकतेच जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, भाऊ, पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कातवड गावचे गावकर म्हणून ते ओळखले जात असत गावातील ग्रामदैवत श्री ब्राम्हण देवाचे ते पुजारी होते.गावातील विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमात नेहमी…

Read Full News

सावंतवाडीत अवकाळी पावसाची हजेरी

नागरिकांची उडाली तारांबळ* *💫सावंतवाडी दि.१४-:* सावंतवाडी शहरात आज अचानक सायंकाळी ४:३० च्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पावसाळा तोंडावर आल्याने तालुक्यात सद्या पावसाळ्यात पूर्वी केली जाणारी कामे वेगात सुरू असून, अचानक पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने सगळ्यांची तारांबळ उडाली आहे.

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी ४२९ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण १३ हजार ७३२ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५,हजार ७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ४२९ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

पावसाळ्यात होणारे शेतीचे नुकसान टाळण्यासाठी संरक्षक भिंत बांधावी

घोटगेवाडीतील शेतकऱ्यांची मागणी *💫दोडामार्ग दि.१४-:* तिलारी धरणातील जलाशयात अचानक पणे गेल्यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळल्याने पाणी साठा वाढल्याने नदीलगत गावात पुरस्थिती निर्माण झाली होती अनेकांची तारांबळ उडाली होती जीवितहानी झाली नाही मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानी घोटगेवाडी येथील शेतकरी यांची झाली होती त्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही त्यामुळे गतवर्षी नदी पात्रातील पुच्छ कालव्याचे पाणी…

Read Full News

लॉकडाऊनचे १ जून पर्यंत कडक निर्बंध जारी

जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यानी केले जाहिर *💫सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून सार्वजनिक हिताच्‍या दृष्‍टीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखणे आणि त्‍यासाठी ठोस उपाययोजना हाती घेणे आवश्‍यक झाले आहे. राज्‍यात Break the Chain अंतर्गत ताळेबंदीचा कालावधी दिनांक ०१/०६/२०२१चे सकाळी ७.०० पर्यंत वाढवून यापूर्वीच्‍या आदेशान्‍वये दिलेल्‍या मार्गदर्शक सूचनासह खालीलप्रमाणे आणखी काही अतिरिक्‍त निर्बंध लागू…

Read Full News

You cannot copy content of this page