मनसे सावंतवाडी व सह्याद्री प्रतिष्ठानचे आयोजन
💫 *सावंतवाडी दि.१४-:* महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकसोहळा दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक ६जून २०२१रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा सावंतवाडी व सह्याद्री प्रतिष्ठान विभाग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. हे शिबीर ६जून दिवशी सावंतवाडी तालुक्यातील मळगाव हायस्कूल मळगाव येथे सकाळी ९.०० ते दुपारी १.०० पर्यंत असणार असून जास्तीत रक्तदात्यांनी या शिबीरात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी शाखा व सह्याद्री प्रतिष्ठान विभाग, सिंधुदुर्ग यांच्यावतीने करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी सुधीर राऊळ मो. नं.765320990 763129704 यांच्याशी संपर्क करावा.
