बाळा आकेरकर मित्रमंडळाची सविता आश्रमाला जीवनाआवश्यक साहीत्याची मदत…

*💫बांदा दि.१४-:* येथील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या बाळा आकेरकर मित्रमंडळाच्या वतीने कुडाळ येथील सविता आश्रमाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जीवनावश्यक साहित्य देण्यात आले. मित्रमंडळाकडून कोरोना कार्यकाळात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. सविता आश्रमाचे व्यवस्थापक श्री. सावंत यांनी साहित्य स्वीकारले व बाळा आकेरकर मित्रमंडळाचे आभार व्यक्त केले. यावेळी जीवनावश्यक साहित्याबरोबरच वाफ घेण्याची मशीन व आवश्यक वैद्यकीय साहित्य देखील देण्यात आले. यावेळी बाळा आकेरकर, देवा माने, सुनील धामापूरकर, निलेश मोरजकर, राकेश परब, विराज परब, शैलेश गवस आदी उपस्थित होते. मित्रमंडळाने केलेल्या आवाहनानुसार बांदा शहरातील सुधीर शिरसाट, देवा माने, बाळा आकेरकर, स्वप्नील पावसकर, राकेश परब, मिलिंद नाईक, निलेश मोरजकर, मनोज सावंत, किरण आगलावे, बाबू आकेरकर, रत्नाकर आगलावे, सुनील धामापूरकर, बाबा काणेकर, लक्ष्मी सावंत, अपेक्षा नाईक, श्वेता कोरगावकर यांनी साहित्य देऊन सहकार्य केले.

You cannot copy content of this page