सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ५५ रूग्ण सापडले

शहरात १२ तर ग्रामीणात ४३

*💫सावंतवाडी दि.१४-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ५५ रुग्ण सापडले असून, शहरात १२ तर ग्रामीण भागात ४३ रुग्ण सापडले आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात उभाबाजार २, लाखेवस्ती २, भटवाडी २, मोरडोंगरी १, जस्तीन नगर १, सावंतवाडी १, सालईवाडा ३, तर ग्रामीण भागात कलबिस्त १०, बांदा ९, केसरी ५ , मळेवाड १, आरोंदा १, भटपावणी १, शेरले १, इन्सुली ३, मडुरा १, तळवडे २, माजगाव ३, माडखोल १ कोलगाव १, चौकुळ २, देवसू १, शिरसंगी १ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ७४८ रुग्ण सक्रिय आहेत.

You cannot copy content of this page