*आयुर्वेदिक महाविद्यालयात ३३ बेडचे कोव्हिड केअर सेंटर होणार सुरू

आमदार दिपक केसरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती*

*💫सावंतवाडी दि.१४-:* सावंतवाडी येथील आयुर्वेदिक महाविद्यालयात ३३ बेडचे कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आमदार दिपक केसरकर यांनी झूम ऍप द्वारे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. तसेच लसीकरण सुरू असलेल्या उपकेंद्रावर नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी १ गाडी उपलब्ध करून दिली जाणार असून, येत्या ३-४ दिवसांत याची सोय करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याच बरोबर कोव्हिड केअर सेंटर वेंगुर्ला येथे सुरू करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

You cannot copy content of this page