घोटगेवाडीतील शेतकऱ्यांची मागणी
*💫दोडामार्ग दि.१४-:* तिलारी धरणातील जलाशयात अचानक पणे गेल्यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळल्याने पाणी साठा वाढल्याने नदीलगत गावात पुरस्थिती निर्माण झाली होती अनेकांची तारांबळ उडाली होती जीवितहानी झाली नाही मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानी घोटगेवाडी येथील शेतकरी यांची झाली होती त्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही त्यामुळे गतवर्षी नदी पात्रातील पुच्छ कालव्याचे पाणी गावात घुसत असल्याने बागायती सह शेतीचे नुकसान होते तेथे संरक्षक भिंत बांधण्यात यावी अन्यथा नदी प्रवाहात बंदोबस्त करावा अशी घोटगेवाडी वासियाची मागणी पूर्ण करावी असे निवेदन तिलारी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांना दिले आहे अन्यथा उपोषण करण्याचा इशारा दिला आहे तिलारी धरणलगत असलेल्या सर्व गावातील कॉजवे साप सफाई करण्यात येत आहे.घोटगे परमे घोटगेवाडी कोनाळ आदी ठिकाणी ग्रामस्थांना अनेक समस्या भेडसावत आहे. घोटगेवाडी कॉजवेच्या वरच्या भागात नदी पात्र कोनाळ गावाच्या लगत असलेल्या पुच्छ कालव्याचे पाणी सरळ घोटगेवाडी येथील शेती बागायतीत संरक्षक भिंत असूनही पाणी घुसून नुकसानी होते गेल्यावर्षी 20 ते 25 लाखाची नुकसानी होऊन फक्त तीस हजार रुपये अनुदान दिले हे तुटपूजे असून याबाबत तिलारी प्रकल्प यंत्रणेकडून कायमस्वरूपी शेतीला पूरक व्यवस्था करावी वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केले जाते त्यामुळे घोटगेवाडी ग्रामस्थ आक्रमक पवित्रा घेणार आहे असे निवेदनात म्हटले आहे
