*💫मालवण दि.१४-:* मालवण खैदा कातवड येथील रहिवासी सुरेश बाबू परब वय ६७ यांचे नुकतेच जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, भाऊ, पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कातवड गावचे गावकर म्हणून ते ओळखले जात असत गावातील ग्रामदैवत श्री ब्राम्हण देवाचे ते पुजारी होते.गावातील विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमात नेहमी सहभागी असतं. मनमिळावू, निष्ठावंत,परोपकारी, असा त्यांचा स्वभाव होता. मुबई मुलुंड येथे कामगार हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया सहाययक म्हणून त्यांनी ४२वर्षे सेवा केली होती सेवानिवृत्ती नंतर त्यांनी आपल्या कातवड गावी राहणे पसंत केले. गावातील कार्यक्रमात हिरहिरीने सहभागी होत असत त्यांच्या आकस्मित निधनाने कातवड गावात शोकाकुळ पससराला आहे.
खैदा कातवड येथील सुरेश परब यांचे निधन
