Headlines

Global Maharashtra Breaking News

व्यापाऱ्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांकडे मांडू

पालकमंत्री उदय सामंत यांचे व्यापाऱ्यांना आश्वासन *💫सावंतवाडी दि.२५-:* पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत आज सावंतवाडी दौऱ्यावर येत असताना आज आकेरी येथे जिल्ह्यातील व्यापारी बांधवांनी त्यांची भेट घेतली आहे. यावेळी पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांनी व्यापाऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत. तसेच यावेळी जेवढे शक्य होईल तेवढे व्यापारी बांधवांसाठी करण्याचे आश्वासन दिले…

Read Full News

चारचाकी झाडावर आदळून युवक जागीच ठार

*💫देवगड दि.२५-:* चालकाचे नियंत्रण सुटून व्हॅगनर गाडी झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातामध्ये फणसगाव पेंडूरकरवाडी येथील सिध्देश रविंद्र मेस्त्री (३०) हा युवक जागीच ठार झाला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी ५ वा. सुमारास विजयदुर्ग कासार्डे मार्गावर बुरंबावडे एस. टी. स्टॉपनजीक झाला. याबाबत मिळालेल्या माहितीनूसार, फणसगाव पेंडूरकरवाडी येथील सिध्देश रविंद्र मेस्त्री हा युवक त्याच्या ताब्यातील व्हॅगनर गाडी घेवून…

Read Full News

सावंतवाडी कब्रस्तान इदगाह येथिल रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू

पालकमंत्री उदय सामंत यांचे मुंतजिमा कब्रस्तान कमिटीला आश्वासन *💫सावंतवाडी दि.२५-:* सावंतवाडी येथील विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी सावंतवाडी दौऱ्यावर असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची आज मुंतजिमा कमिटी कब्रस्तान सावंतवाडी च्या शिष्टमंडळाने आकेरी विश्रामगृहावर भेट घेतली. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून पालकमंत्री फंडातून सावंतवाडी कब्रस्थान ईदगाह वर नमाज पठण करण्यासाठी जाणाऱ्या कच्चा रस्त्याचे काम पूर्ण करून…

Read Full News

सावंतवाडी शहरातील विकासकामांचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

खासदार विनायक राऊत व आमदार दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती *💫सावंतवाडी दि.२५-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत आणि स्थानिक आमदार दिपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडी येथील जिल्हा नियोजन आणि नगरोत्थानच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विकासकामांची भूमिपूजन आज करण्यात आली आहेत. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पडते, सावंतवाडीचे…

Read Full News

समाजसेवक सुनील नारकर यांना ‘लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार जाहीर

कोल्हापुर येथील आविष्कार फाउंडेशनचे मिळाले पत्र उद्या वितरण *💫वैभववाडी दि.२५-:* भुईबावडा गावचे सुपुत्र समाजसेवक सुनिल नारकर यांना ‘आविष्कार फाऊंडेशन’ कोल्हापूर या संस्थेने ‘लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार’ जाहीर केला आहे. नुकतेच पुरस्कार निवडीचे पत्र त्यांना प्राप्त झाले आहे. २६ जून रोजी शाहू जयंती दिवशी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वच…

Read Full News

छत्रपती शाहु महारांच्या जयंती दिवशी मागासवर्गीयांचे पदोन्नती आदेश निर्गमित करा

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्र्यांना निवेदन *💫कणकवली दि.२५-:* छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशाचे छत्रपती शाहू महाराजांनी मागासवर्गीयांना सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या आरक्षणाच्या निर्णया दिवशी आपल्या राज्यात मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणाबाबतचे आदेश 26 जुन 2021 रोजी निर्मित करावा आणि पुरोगामी शिव – शाहुंचा वारसा पुढे चालू ठेवावा अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने मागणी करण्यात आली. कास्ट्राईब…

Read Full News

कणकवलीत 28 रोजी मनसे करणार घंटानाद

तक्रार करूनही खाजगी कोविड केंद्रचालकांवर कारवाई नाही:दया मेस्त्री *💫कणकवली दि.२५-:* कोरोना महामारीत खाजगी कोविड केंद्र यांनी जनतेची लूटमार चालविली असून तक्रार करूनही खाजगी कोविड केंद्रचालक प्रमुखांवर कोणतीही कारवाई नाही. त्यामुळे 28 जून 2021रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपविभागीय दंडाधिकारी कार्याल्यासमोर घंटा करून संबंधित शासकीय यंत्रणेला जाग आणुन रुग्णांच्या चाललेल्या लूटमारीला नक्कीच आळा घालणार असल्याचा इशारा मनसे…

Read Full News

व्हायरल व्हिडिओ गतवर्षीचा

लॉकडाऊन बाबत सोशल मिडियावर फिरत असलेल्या व्हिडिओबाबत पालकमंत्री सामंत यांचे स्पष्टीकरण *💫सावंतवाडी-:* जिल्ह्यात १ जुलै पासून ८ – १० दिवस लॉक डाऊन लावण्यात येणार असल्याचा एक व्हिडिओ सर्वत्र सोशल मीडिया वर फिरत असून, असा कोणताही निर्णय पालकमंत्री म्हणून मी घेतला नाही आहे. तो व्हिडिओ गेल्या वर्षीचा असून, जिल्ह्यात भितीचे वातावरण निर्माण करण्यासाठी हे कोणीतरी षड्यंत्र…

Read Full News

पोलिसाशी हुज्जत

एका विरोधात विजयदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल देवगड : प्रतिनिधी पडेल कॅन्टिन येथे ड्युटीवर असणा-या पोलिसांशी मद्यप्राशन करून हुज्जत घालणा-या पुरळ हुर्शी  येथील एका युवकाविरूध्द विजयदूर्ग पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, हुर्शी येथील एक २४ वर्षीय युवक शुक्रवारी सकाळी ११ वा.सुमारास पडेल कॅन्टिन येथे मद्यप्राशन करून आरडाओरडा करीत होता.यावेळी पोलिसांनी त्याला विचारणा केली असता त्यांनी पोलिसांशी…

Read Full News

दीपक केसरकर यांनीच जिल्ह्यात जास्त निधी आणला

पालकमंत्री उदय सामंत: सावंतवाडीत जागा हस्तांतरण अभावी कामे रखडली *💫सावंतवाडी दि.२५ विनय वाडकर-:* जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त करून देण्याचे श्रेय माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांचे आहे. त्यांनी पालकमंत्री असताना मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात निधी आणला होता. परंतु तो काही ठिकाणी खर्च न झाल्याने परत गेला आहे. तसेच शहरातील विकास कामांसाठी निधी प्राप्त झाला असून देखील…

Read Full News

You cannot copy content of this page