खासदार विनायक राऊत व आमदार दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती
*💫सावंतवाडी दि.२५-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत आणि स्थानिक आमदार दिपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडी येथील जिल्हा नियोजन आणि नगरोत्थानच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विकासकामांची भूमिपूजन आज करण्यात आली आहेत. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पडते, सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब, सेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ, दोडामार्ग तालुका प्रमुख बाबुराव धुरी, सावंतवाडीच्या उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक बाबू कुडतरकर, सुरेंद्र बांदेकर, डॉ. जयेंद्र परुळेकर, आनंद नेवगी, नासिर शेख, राजू बेग, उदय नाईक, नगरसेविका अनारोजीन लोबो, दिपाली सावंत, माधुरी वाडकर, शुभांगी सुकी, भारती मोरे, समृध्दी विर्नोडकर, दिपाली भालेकर, उत्कर्षा सासोलकर, सेनेचे युवा नेते संदेश पारकर, सेना पदाधिकारी शब्बीर मणियार, प्रशांत कोठावळे, अपर्णा कोठावळे, मायकल डिसोजा, गणेशप्रसाद गवस, विशाल सावंत, अशोक दळवी, प्रतिक बांदेकर, तसेच भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, तसेच तहसीलदार राजाराम म्हात्रे, मुख्याधिकारी जयंत जावडेकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
