सावंतवाडी कब्रस्तान इदगाह येथिल रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू

पालकमंत्री उदय सामंत यांचे मुंतजिमा कब्रस्तान कमिटीला आश्वासन

*💫सावंतवाडी दि.२५-:* सावंतवाडी येथील विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी सावंतवाडी दौऱ्यावर असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची आज मुंतजिमा कमिटी कब्रस्तान सावंतवाडी च्या शिष्टमंडळाने आकेरी विश्रामगृहावर भेट घेतली. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून पालकमंत्री फंडातून सावंतवाडी कब्रस्थान ईदगाह वर नमाज पठण करण्यासाठी जाणाऱ्या कच्चा रस्त्याचे काम पूर्ण करून त्या रस्त्यास डांबरीकरण करून मिळावे असे निवेदन कब्रस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आले. यावेळी कब्रस्तान मधील उद्भवणाऱ्या अडचणींबाबत चर्चाही करण्यात आली. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी आपण याकडे लक्ष घालून रस्त्याचे काम मार्गी लावू असे आश्वासन दिले. याप्रसंगी कब्रस्तान ट्रस्टचे अध्यक्ष तौकिर शेख, उपाध्यक्ष मुजीब शेख, सचिव परवेज बेग, खजिनदार सोहाब बेग, सल्लागार हिदायतुल्ला खान, सदस्य अल्ताफ मुल्ला, इरफान शेख, जावेद शहा, बसित पडवेकर, अरिफ करोल आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page