कोल्हापुर येथील आविष्कार फाउंडेशनचे मिळाले पत्र उद्या वितरण
*💫वैभववाडी दि.२५-:* भुईबावडा गावचे सुपुत्र समाजसेवक सुनिल नारकर यांना ‘आविष्कार फाऊंडेशन’ कोल्हापूर या संस्थेने ‘लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार’ जाहीर केला आहे. नुकतेच पुरस्कार निवडीचे पत्र त्यांना प्राप्त झाले आहे. २६ जून रोजी शाहू जयंती दिवशी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत असताना सुद्धा एक यशस्वी उद्योजक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सुनिल नारकर यांनी नेहमी सामाजिक कामात आपले योगदान अविरत सुरू ठेवले आहे. वयाच्या २३ व्या वर्षी त्यांना ‘महाराष्ट्र राज्य समाजगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोरोना काळात त्यांनी अनेकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली आहे. लहानपणापासूनच त्यांनी सामाजिक कार्य करण्यास सुरूवात केली. अनेक गरजूंना त्यांनी आर्थिक मदत केली आहे. त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत ‘अविष्कार फाऊंडेशन’ कोल्हापूर या संस्थेने समाजसेवक सुनिल नारकर यांना ‘लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार’ जाहीर केला आहे. २६ जून रोजी शाहू जयंती दिवशी त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वच क्षेत्रातून कौतुक होत आहे.
