पालकमंत्री उदय सामंत: सावंतवाडीत जागा हस्तांतरण अभावी कामे रखडली
*💫सावंतवाडी दि.२५ विनय वाडकर-:* जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त करून देण्याचे श्रेय माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांचे आहे. त्यांनी पालकमंत्री असताना मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात निधी आणला होता. परंतु तो काही ठिकाणी खर्च न झाल्याने परत गेला आहे. तसेच शहरातील विकास कामांसाठी निधी प्राप्त झाला असून देखील जागा हस्तांतरण न झाल्याने विकास कामे अडकून पडली आहेत. त्यासाठी येत्या १५ दिवसात महसूल विभागाची बैठक लावू असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. यावेळी नगरपालिका इमारतीच्या नूतनीकरणासाठी आपण नक्कीच निधी देवू, ती आपली जबाबदारी राहील असा शब्द देताना मात्र नगराध्यक्ष संजू परब यांनी हरिश्चंद्र राजासारखे आपल्या शब्दावर कायम राहावे असा चिमटा काढला आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की, जिल्ह्याचा विकास होणे गरजेचे असून, खिलाडूवृत्ती ठेवून काम करणे गरजेचे आहे. तरच जिल्ह्याचा विकास होवू शकतो. विकास कामात राजकारण होता नये. असे म्हणाले आहेत.
