एका विरोधात विजयदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
देवगड : प्रतिनिधी पडेल कॅन्टिन येथे ड्युटीवर असणा-या पोलिसांशी मद्यप्राशन करून हुज्जत घालणा-या पुरळ हुर्शी येथील एका युवकाविरूध्द विजयदूर्ग पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, हुर्शी येथील एक २४ वर्षीय युवक शुक्रवारी सकाळी ११ वा.सुमारास पडेल कॅन्टिन येथे मद्यप्राशन करून आरडाओरडा करीत होता.यावेळी पोलिसांनी त्याला विचारणा केली असता त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली.पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून आरडाओरडा करून बेशिस्त वर्तन केल्याप्रकरणी मुंबई दारूबंदी कायदा कलम ८५ प्रमाणे कारवाई केली आहे.
