Headlines

पाट-गांधीनगर महसूल सजा पूर्ववत…

वैभव नाईक, अतुल बंगे यांच्या मागणीला यश:महेश वेळकर यांच्याही पाठपुरावा; नागरिकांची गैरसोय दूर होणार..

⚡कुडाळ ता.२४-: हुमरमळा महसूल गाव स्वतंत्र झाल्यानंतर पाट-गांधीनगरचा समावेश हुमरमळा महसूल गावात करण्यात आला होता. मात्र, या बदलामुळे पाट-गांधीनगरमधील नागरिकांची गैरसोय होत होती. त्यामुळे पाट-गांधीनगर महसूल सजा पूर्ववत करण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे आणि महेश वेळकर यांनी सातत्याने लावून धरली होती. अखेर या मागणीला यश आले असून पाट-गांधीनगर महसूल सजा पूर्ववत करण्यात आली आहे.
हुमरमळा महसूल गाव स्वतंत्र झाल्यानंतर पाट-गांधीनगरचा समावेश हुमरमळा महसूल गावात करण्यात आला होता. मात्र, या व्यवस्थेमुळे स्थानिक नागरिकांना महसूलविषयक कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे पाट-गांधीनगरचा पूर्वीप्रमाणे समावेश करण्यात यावा आणि हुमरमळा महसूल गाव स्वतंत्र ठेवावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती.
या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी माजी आमदार वैभव नाईक आणि माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. महेश वेळकर यांनीही या कामासाठी सातत्याने प्रयत्न केले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून पाट-गांधीनगर महसूल सजा पूर्ववत झाल्याने स्थानिक नागरिकांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.

You cannot copy content of this page