पालकमंत्री उदय सामंत यांचे व्यापाऱ्यांना आश्वासन
*💫सावंतवाडी दि.२५-:* पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत आज सावंतवाडी दौऱ्यावर येत असताना आज आकेरी येथे जिल्ह्यातील व्यापारी बांधवांनी त्यांची भेट घेतली आहे. यावेळी पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांनी व्यापाऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत. तसेच यावेळी जेवढे शक्य होईल तेवढे व्यापारी बांधवांसाठी करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच लाईट बिल संदर्भात देखील लवकरच मीटिंग लावून तोडगा काढण्याचं आश्वासन दिले आहे. तसेच व्यापाऱ्यांना लवकरच लसीकरण करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे. यावेळी व्यापाऱ्यांच्या भावना आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडू. गरज भासल्यास खासदार विनायक राऊत यांच्या सह व्हिडिओ कॉन्फरन्स वर बैठक आयोजित करू असे आश्वासन दिले आहे. तसेच पुढील आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्यावर लाईट बिल आणि हॉटेल व्यवसायिक यांच्या संदर्भात चर्चा चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे.
