*💫बांदा दि.२५-:* विद्यार्थी हिताय , राज्यस्तरीय समूह, बालसंस्कार संस्था, आयोजित राज्यस्तरीय हस्ताक्षर स्पर्धेमध्ये केंद्र शाळा बांदा नं.१ मधिल, इयत्ता तिसरी मध्ये शिकणारा विद्यार्थी कु. नील नितीन बांदेकर याने हजारो विद्यार्थ्यांमधून बेस्ट 250 आणि त्यातून टॉप-21 मध्ये निवडून आल्यानंतर पुन्हा एकदा अंतिम फेरीमध्ये संपूर्ण राज्यामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त करून अभिनंदनीय विजय संपादन केला आहे. या यशात त्याला त्याचे मामा डॉक्टर उमेश सावंत, त्याचबरोबर बांदा केंद्र शाळेतील समस्त शिक्षक वृंद, मुख्याध्यापिका सरोज नाईक, वर्गशिक्षिका रसिका मालवणकर आणि उपक्रमशील शिक्षक जे डी पाटील सर यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. नीलने यापूर्वीही विविध स्पर्धांतून यश संपादन केले आहे. नीलवर विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे
हस्ताक्षर स्पर्धेत नील बांदेकर पुन्हा एकदा राज्यात अव्वल
