बांदा येथे शॉर्टसर्किटमुळे घराला आग

*सुदैवाने जीवितहानी नाही*

*💫बांदा दि.२५-:* बांदा येथील महालक्ष्मी स्टीलचे मालक प्रवीण शिरसाट यांच्या घराला शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. आग लागल्याचे समजताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आगीत अडकलेल्या दोन मुलांसह अन्य कुटुंबियांना स्थानिक ग्रामस्थांनी सुरक्षितरित्या बाहेर काढल्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. कुडाळ एमआयडीसीचा बंब घटनास्थळी दाखल झाला असून आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. मात्र या आगीत मोठ्या प्रमाणात घराचा भाग आगीच्या भक्ष्यस्थानी आला असून त्यामुळे शिरसाट यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते.

You cannot copy content of this page