⚡कुडाळ ता. २६-: शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज कुडाळ येथील ‘सिंधुदुर्ग राजा’चे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची विधिवत पूजा करून जिल्ह्यातील नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

दरम्यान, सिंधुदुर्ग राजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने संजू परब यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
