तक्रार करूनही खाजगी कोविड केंद्रचालकांवर कारवाई नाही:दया मेस्त्री
*💫कणकवली दि.२५-:* कोरोना महामारीत खाजगी कोविड केंद्र यांनी जनतेची लूटमार चालविली असून तक्रार करूनही खाजगी कोविड केंद्रचालक प्रमुखांवर कोणतीही कारवाई नाही. त्यामुळे 28 जून 2021रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपविभागीय दंडाधिकारी कार्याल्यासमोर घंटा करून संबंधित शासकीय यंत्रणेला जाग आणुन रुग्णांच्या चाललेल्या लूटमारीला नक्कीच आळा घालणार असल्याचा इशारा मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी दिला आहे कोरोना महामारीत खाजगी कोविड केंद्र यांनी जनतेची चालवलेली लूट तसेच महामारीत शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जीवन आरोग्यदायी योजनेचा लाभ कोरोना रुग्ण लाभार्थी याना देण्याचे जाहीर केले, खाजगी कोविड केंद्रातील दिल्या जाणाऱ्या बेड्साहितच्या उपचाराचे शासकीय दर जाहीर केले.मात्र याची अंमलबजावणी होताना दिसत नसून जनतेची बेसुमार आवाजवी दर आकारून लुटमार चाललेली आहे.रुग्णांना बिले दिली जात नाहीत. उपचाराची फाईल दिली जात नाही.या बाबत उपविभागीय अधिकारी यांना 3 जून 2021 रोजी निवेदन देऊन संबंधित शासकीय यंत्रणेला जाग आणली. मात्र अदयापही फार काही निर्बंध आल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे आता मनसे रुग्णांच्या चाललेल्या लूटमारीला नक्कीच आळा घालणार असल्याचा इशारा मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी दिला आहे
