Headlines

Global Maharashtra Breaking News

सुशांत दळवी खूनप्रकरणी सखोल तपासाची मागणी…

कळसुली ग्रामस्थांचे पालकमंत्री नाम. नितेश राणेंना निवेदन.. ⚡कणकवली ता.२८-: बांधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवी यांच्या निर्घृण खूनप्रकरणी सखोल व निष्पक्ष तपास करून मुख्य आरोपींना अटक करावी, अशी मागणी कळसुली पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात ग्रामस्थांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,…

Read Full News

कलमठला दर दिवशी ३ लाख लिटर पाणी मिळणार…

नगराध्यक्ष संदेश पारकर व कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांच्या उपस्थितीत कलमठ ला पाणी पुरवठा सुरू.. कणकवली : कणकवली शहरातील सांडपाणी गडनदीपात्रात सोडले जात असल्याने नदीपात्रातील पाणी दूषित झाले. नदीपात्रातील पाण्यावरील कलमठ गावची नळपाणी योजना बंद पडली आहे. त्यामुळे कलमठ बाजारपेठ, नाडकर्णीनगर व अन्य भागाला होणारा पाणीपुरवठा थांबला आहे. कलमठच्या पाणीप्रश्नी सरपंच संदीप मेस्त्री, ग्रा. पं….

Read Full News

…अन्यथा वेळ काढल्यास पोलीस ठाण्यावर मोर्चा काढू

वैभव नाईक, परशुराम उपरकर यांचा इशारा:सुशांत दळवी खून प्रकरण तापले.. कणकवली : सुशांत दळवी खून प्रकरणाबाबत पोलिसी तपासाविषयी साशंकता निर्माण होत आहे. पोलीस अद्याप या घटनेविषयी माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. वास्तविक सुशांत यांना दोन महिन्यापूर्वी सत्ताधारी पक्षातील एका नेत्याने धमकी दिली होती. याबाबत सुशांत यांनी पोलिसांकडे तक्रारही केली होती. त्यामुळे या घटनेचा पोलिसांनी सखोल…

Read Full News

सावंतवाडी विधानसभा क्षेत्रासाठी संदीप गावडे यांची BLA 1 विधानसभा प्रमुख पदावर नियुक्ती…

भाजप महाराष्ट्रकडून मतदार पुनर्निरीक्षण (SIR) अभियानासाठी जबाबदारी सोपवली.. ⚡सावंतवाडी, ता. २८-: भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने मतदार यादी पुनर्निरीक्षण (SIR) अभियानांतर्गत सावंतवाडी विधानसभा क्षेत्रासाठी BLA 1 (विधानसभा प्रमुख) पदावर श्री. संदीप एकनाथ गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील अधिकृत पत्र दिनांक २६ मार्च २०२६ रोजी भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयातून देण्यात आले…

Read Full News

तळाशीलच्या मच्छिमारांवरील अन्यायाची प्रशासनाने दखल न घेतल्यास आमरण उपोषण छेडू…

रेवंडी – तळाशील वादात मच्छिमार नेत्यांचा इशारा.. ⚡मालवण ता.२८-: रेवंडी येथील जेटीवर तळाशीलच्या मच्छिमार ग्रामस्थांना मासेवाहतुकीस व वाहने लावण्यास तेथील ग्रामस्थांकडून विरोध असल्याने मच्छिमार बांधवांवर होणाऱ्या या अन्यायाबाबत आज मच्छिमार नेत्यांनी तहसीलदार गणेश लव्हे यांची भेट घेऊन लक्ष वेधले. तोंडवळी तळशील येथील मच्छिमार बांधवांवर होणाऱ्या अन्याया बाबत जर प्रशासनाने दखल घेतली नाही, तर त्या ठिकाणी…

Read Full News

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेसाठी ५० हजारांची देणगी…

कॅथॉलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीकडून २५ हजार, तर स्वामी भक्ताकडूनही २५ हजारांचा हातभार.. ⚡सावंतवाडी ता.२८-:सामाजिक बांधिलकी जपत सेवाभावी कार्यात अग्रेसर असलेल्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिका उपक्रमासाठी विविध स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर कॅथोलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, सावंतवाडी यांच्या वतीने २५ हजार रुपयांची देणगी देण्यात आली. तसेच एका स्वामी भक्तानेही २५ हजार रुपये…

Read Full News

नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या पाठपुराव्याला यश…

सावंतवाडीतील जि.प. शाळांना संगणक भेट; विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षणाचा मार्ग मोकळा,नितेश राणे यांच्या हस्ते वितरण.. ⚡सावंतवाडी ता.२८-: सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते आज, सावंतवाडी येथील जि.प. प्राथमिक शाळा क्रमांक ६ (भटवाडी) येथे संगणक प्रदान करण्यात आला. विधान परिषदेचे आमदार श्री. डावखरे यांच्या स्थानिक विकास निधीतून हे संगणक प्रदान करण्यात आले.यासाठी नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या सातत्यपूर्ण…

Read Full News

सावंतवाडी नगरपरिषदेकडून थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई…

⚡सावंतवाडी ता.२८-: नगरपरिषदेच्या कर विभागाकडून मालमत्ता थकबाकीदारांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर व प्रशासकिय अधिकारी तथा कार्यालयीन अधिक्षक वैभवकुमार अंधारे, कर व प्रशासकिय अधिकारी गोविंद गवंडे, कर निरिक्षक श्रीम. प्राची पाटील, लेखापाल प्रसाद बटवाल, स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, नगररचनाकार गौरव बुगड यांच्या जप्ती पथकाद्वारे सावंतवाडी शहरातील 20 मालमत्ता…

Read Full News

शिरोडा गावातील अनैतिक धंद्यांना आळा घाला …

शिरोडा ग्रामस्थांची मागणी: पोलिसांना निवेदन केले सादर.. वेंगुर्लावेंगुर्ला तालुक्यातीलशिरोडा गावात ब-याच ठिकाणी चायनीय सेंटर, समुद्र किनारी, मिठागर परिसर, उपजिल्हा रुग्णालय शिरोडाच्या मागील बाजूस या परिसरात गांजा, चरस, अमली पदार्थ रात्रौ राजरोसपणे विक्री करुन सेवन केल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळेत शिरोडा परिसरात नागरिकांच्या असुरक्षितेचे वातावरण निर्माण झालेले आहे. या प्रकारामुळे अमली पदार्थ विक्री करणा-यांकडून…

Read Full News

सावंतवाडीत स्वच्छता व्यवस्थेला बळकटी…

नवीन सक्शन व्हेईकल प्राप्त: सोमवारी होणार शुभारंभ; सुधीर आडीवरेकर यांची माहिती.. सावंतवाडी ता.२८-: शहरातील स्वच्छता व्यवस्थेला अधिक गती देण्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेला अत्याधुनिक सक्शन व्हेईकल प्राप्त झाले आहे. गटार, नाले तसेच सेप्टिक टँक साफसफाईसाठी हे वाहन अत्यंत उपयुक्त ठरणार असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्यदायी वातावरणाच्या दृष्टीने मोठी मदत होणार आहे. याचे उद्घाटन सोमवारी नगराध्यक्ष तसेच प्रभारी नगराध्यक्ष…

Read Full News

You cannot copy content of this page