कलमठला दर दिवशी ३ लाख लिटर पाणी मिळणार…

नगराध्यक्ष संदेश पारकर व कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांच्या उपस्थितीत कलमठ ला पाणी पुरवठा सुरू..

कणकवली : कणकवली शहरातील सांडपाणी गडनदीपात्रात सोडले जात असल्याने नदीपात्रातील पाणी दूषित झाले. नदीपात्रातील पाण्यावरील कलमठ गावची नळपाणी योजना बंद पडली आहे. त्यामुळे कलमठ बाजारपेठ, नाडकर्णीनगर व अन्य भागाला होणारा पाणीपुरवठा थांबला आहे. कलमठच्या पाणीप्रश्नी सरपंच संदीप मेस्त्री, ग्रा. पं. सदस्य धीरज मेस्त्री यांनी लक्ष वेधून कणकवली न.पं. च्या नळपाणी योजनेद्वारे कलमठ गावाला स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली होती.

त्यानुसार कलमठ गावाला कणकवली नगरपंचायतच्या नळपाणी योजनेद्वारे दर दिवशी ३ लाख लिटर पाणी सोडले जाणार आहे. कणकवली चे नगराध्यक्ष संदेश पारकर व कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांच्या उपस्थितीत आज कलमठ येथील पाण्याचा ऑल सुरू करून कलमठ गावाला पाणी पुरवठा सुरू करण्यात आला.

मात्र, पाणी पुरवठासाठी लागणारे यंत्रणेवर येणारा खर्च व गत काळात पाणीपुरवठयासाठी केलेल्या खर्चाचे थकीत बिल ग्रा. पं. ने नगरपंचायतीमध्ये जमा करावे, असे श्री. पारकर यांनी केले आहे.

सांडपाणी नदीपात्रात गेल्यामुळे पाणी दूषित झाले. परिणामी कलमठ गावाची नळपाणी योजना बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे कलमठ बाजारपेठ, नाडकर्णीनगर सह अन्य भागाला होणारा पाणीपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान कलमठ च्या नागरिकांनी नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे लक्ष वेधले होते. तातडीने नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी नगरपंचयातीच्या नळपाणी योजनेद्वारे कलमठ गावाला दर दिवशी ३ लाख लिटर पाणी देण्याचा निर्णय घेतला. आज घेतलेल्या निर्णयाप्रमाणे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी पाणीपुरवठा सुरू केला.

यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, मनोज धुमाळे, प्रशांत तांबे नळकामगार, रवी लाड, विजय राणे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page