नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या पाठपुराव्याला यश…

सावंतवाडीतील जि.प. शाळांना संगणक भेट; विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षणाचा मार्ग मोकळा,नितेश राणे यांच्या हस्ते वितरण..

⚡सावंतवाडी ता.२८-: सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते आज, सावंतवाडी येथील जि.प. प्राथमिक शाळा क्रमांक ६ (भटवाडी) येथे संगणक प्रदान करण्यात आला. विधान परिषदेचे आमदार श्री. डावखरे यांच्या स्थानिक विकास निधीतून हे संगणक प्रदान करण्यात आले.यासाठी नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जि.प. शाळा क्रमांक ६ भटवाडी सावंतवाडी तसेच वि. स. खांडेकर विद्यालय सावंतवाडी या दोन्ही शाळांना संगणक उपलब्ध झाले आहेत.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची सुविधा मिळणार असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण अधिक प्रभावी व गुणवत्तापूर्ण होण्यास मदत होणार आहे. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, शैक्षणिक विकासासाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मत व्यक्त केले आहे.

You cannot copy content of this page