सावंतवाडी विधानसभा क्षेत्रासाठी संदीप गावडे यांची BLA 1 विधानसभा प्रमुख पदावर नियुक्ती…

भाजप महाराष्ट्रकडून मतदार पुनर्निरीक्षण (SIR) अभियानासाठी जबाबदारी सोपवली..

⚡सावंतवाडी, ता. २८-: भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने मतदार यादी पुनर्निरीक्षण (SIR) अभियानांतर्गत सावंतवाडी विधानसभा क्षेत्रासाठी BLA 1 (विधानसभा प्रमुख) पदावर श्री. संदीप एकनाथ गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या संदर्भातील अधिकृत पत्र दिनांक २६ मार्च २०२६ रोजी भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयातून देण्यात आले असून, या नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातील मतदार पुनर्निरीक्षणाचे काम प्रभावीपणे पार पाडण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा उपयोग होईल, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.
सदर नियुक्ती पत्रावर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरी असून, जिल्हाध्यक्ष, आमदार तसेच विभाग संघटन मंत्र्यांना याची प्रत पाठविण्यात आली आहे.या नियुक्तीमुळे स्थानिक पातळीवर पक्ष संघटन अधिक मजबूत होण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आहे.

You cannot copy content of this page