Headlines

Global Maharashtra Breaking News

मालवण रोटरी क्लबच्या शिबिरात ५२ मधुमेहग्रस्त रुग्णांची मोफत नेत्रपटल तपासणी…

⚡मालवण ता.२८-:रोटरी क्लब मालवण व आरसीसी क्लब मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण येथील लिमये हॉस्पिटल मध्ये मधुमेहग्रस्त रुग्णांच्या मोफत नेत्रपटल (डोळ्याचा पडदा) OCT तपासणी शिबिर संपन्न झाले. या शिबिराचा ५२ रुग्णांनी लाभ घेतला. त्यापैकी ७ जणांना पुढील उपचाराची आवश्यकता असून त्यांच्यावर सांगली येथे मोफत उपचार करण्यात येणार आहेत. या शिबिरासाठी रोटरी क्लब ऑफ सांगली मिडटाऊन…

Read Full News

कणकवली घनकचरा प्रकल्पात प्लास्टिक साठ्याला लागली आग…

आग वाऱ्यामुळे भडकली ; ८० टक्के प्लास्टिक जळून खाक, मोठे नुकसान.. ⚡कणकवली ता.२८-: कणकवली नगरपंचायतच्या हरकुळ येथील माळावर असलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प केंद्रातील प्लास्टिक साठवण भागात शनिवारी सायंकाळी सुमारे ४ वा. च्या दरम्यान आग लागल्याची घटना घडली. ज्या ठिकाणी प्लास्टिक कचरा साठवला जातो, त्या ठिकाणी मागील बाजूने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे….

Read Full News

वेंगुर्ला शहरातील प्रसिद्ध श्री देव हनुमान मंदिर येथे भव्य दशावतार नाट्यमहोत्सवाचा शुभारंभ…

⚡वेंगुर्ला ता.२८-: वेंगुर्ला शहरातील प्रसिद्ध मारुती मंदिर स्टॉप येथील श्री देव हनुमान मंदिर येथेश्री हनुमान मंदिर सेवा न्यास वेंगुर्ला यांच्यामार्फत आज शनिवार दि. 28 मार्च तेगुरुवार दि. २ एप्रिल या कालावधीत भव्य दशावतार नाट्यमहोत्सव व सार्वजनिकश्री हनुमान जन्मोत्सव २०२६ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.शनिवार दि. २८ मार्च रोजी सायंकाळी ७ वा. महापुरुष कलावैभव दशावतार नाट्य…

Read Full News

जिल्ह्यात उत्तम आरोग्य सेवेसाठी प्रयत्न…

पालकमंत्री:नेरूर येथील महाआरोग्य शिबिराचा १२८९ रुग्णांनी घेतला लाभ ,बेळगाव येथील के.एल्.ई. रुग्णालयातही होणार उपचार.. ⚡कुडाळ ता.२८-: सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य सेवेत स्वयंपूर्ण व्हावा. येथेच जिल्हावासियांना चांगली आरोग्य सेवा मिळावी. जिल्हावासियांना आरोग्य सेवेसाठी अन्य ठिकाणी जावे लागू नये, यासाठी उत्तम आरोग्य व्यवस्था येथे निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. कै….

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी शिक्षक मंडळाचे विविध पुरस्कार जाहीर…

⚡बांदा ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी शिक्षक मंडळाच्या वतीने सन 2025-26 या वर्षासाठी विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये आदर्श हिंदी शिक्षिका, आदर्श मुख्याध्यापक तसेच हिंदी प्रचारक आणि विशेष सन्मान पुरस्कारांचा समावेश आहे.यावर्षी आदर्श हिंदी शिक्षिका पुरस्कार मोंड हायस्कूल, देवगड येथील सौ. असावरी सुनील कदम यांना जाहीर झाला आहे. तसेच स्व. हनुमंत गोविंद दळवी स्मृती…

Read Full News

तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी समन्वय गरजेचा…

गणेश राणे:देवगडमध्ये कृषी महोत्सव २०२६ उत्साहात.. ⚡देवगड ता.२८-: शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या सर्व योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. गावातील ग्रामसभांमध्ये कृषी सहाय्यकांनी जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे, असे मत देवगड पंचायत समितीचे सभापती गणेश राणे यांनी व्यक्त केले.देवगड तालुका कृषी विभागाच्यावतीने जामसंडे येथील सांस्कृतिक भवन येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा…

Read Full News

मराठीचा दर्जा वाढविण्यासाठी पाट हायस्कुल सोबत गीतकार गुरु ठाकूर…

पाट हायस्कूल मध्ये गीतकार गुरु ठाकूर यांची शिक्षकांसोबत ‘मन की बात’.. ⚡कुडाळ ता.२८-: पाट हायस्कूलमध्ये गीतकार गुरु ठाकूर यांनी सदिच्छा भेट दिली . या भेटीदरम्यान मराठी दर्जा वाढविण्याबाबत शिक्षकांशी चर्चा करण्यात आली. मराठी विषय सुधारण्यासाठी विविध उपक्रमही सुचविले. यामध्ये विविध स्पर्धेचा आयोजन करण्यात येऊन त्यांना आपल्या मार्फत बक्षीस योजना राबविण्याचे गुरु ठाकूर यांनी जाहीर केले.एस….

Read Full News

विद्यार्थ्यांनो राष्ट्रकार्यात सहभागी व्हा…

डॉ. विजय जोशी :संत राऊळ महाराज महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ संपन्न.. ⚡कुडाळ ता.२८-: बदलत्या काळाचे भान ठेवा. काळासोबत चालाल तर टिकाल. आज तुम्हाला जी पदवी मिळाली आहे त्याची आहुती समाज यज्ञामध्ये द्या आणि राष्ट्रकार्यात सहभागी व्हा, असे आवाहन मुंबईतील सोमय्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा माजी डीन डॉ. विजय जोशी यांनी केले. डॉ. विजय जोशी यांच्या…

Read Full News

आंबा-काजू बागायतदारांची फसवणूक; भरपाईवरून उपरकरांचा सरकारवर घणाघात…

⚡कणकवली ता.२८-: आंबा व काजू बागायतदारांना जाहीर केलेली भरपाई अत्यंत अपुरी असून सरकारने सरळ फसवणूक केली आहे, अशी तीव्र टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली. हेक्टरी आंब्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी असताना विमा भरलेल्यांना केवळ ४२ हजार आणि विमा न भरलेल्यांना २२ हजार रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक झाडामागे अवघे २२०…

Read Full News

कणकवली रेल्वे स्थानकात सरकत्या जिन्याचे भूमिपूजन…

⚡कणकवली ता.२८-: कणकवली रेल्वे स्थानकातील सरकता जीनाच्या कामाचे भूमिपूजन व वातानुकुलित कक्षाचे उद्घाटन मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे, कोकण रेल्वेचे डीओ सुनील गुप्ता, कोकण रेल्वेचे अधिकारी शैलेंद्र बापट, शैलेश आंबोडकर, प्रशांत गाड, सुनील नारकर, आरपीएफचे कोकण विभागीय आयुक्त यश मिश्रा, अधिकारी गोकुळ…

Read Full News

You cannot copy content of this page