कणकवली घनकचरा प्रकल्पात प्लास्टिक साठ्याला लागली आग…

आग वाऱ्यामुळे भडकली ; ८० टक्के प्लास्टिक जळून खाक, मोठे नुकसान..

⚡कणकवली ता.२८-: कणकवली नगरपंचायतच्या हरकुळ येथील माळावर असलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प केंद्रातील प्लास्टिक साठवण भागात शनिवारी सायंकाळी सुमारे ४ वा. च्या दरम्यान आग लागल्याची घटना घडली. ज्या ठिकाणी प्लास्टिक कचरा साठवला जातो, त्या ठिकाणी मागील बाजूने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे आग अल्पावधीतच भडकली. या आगीत साठवलेल्या प्लास्टिकपैकी जवळपास ८० टक्के प्लास्टिक जळून खाक झाले असून मोठे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष संदेश पारकर, नगरसेवक सत्यजित पारकर, बबली राणे तसेच घनकचरा प्रकल्प केंद्राचे ठेकेदार, अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या बंबाच्या सहाय्याने आग विझवण्याचे प्रयत्न उशिरापर्यंत सुरू होते.

You cannot copy content of this page