वेंगुर्ला शहरातील प्रसिद्ध श्री देव हनुमान मंदिर येथे भव्य दशावतार नाट्यमहोत्सवाचा शुभारंभ…

⚡वेंगुर्ला ता.२८-: वेंगुर्ला शहरातील प्रसिद्ध मारुती मंदिर स्टॉप येथील श्री देव हनुमान मंदिर येथे
श्री हनुमान मंदिर सेवा न्यास वेंगुर्ला यांच्यामार्फत आज शनिवार दि. 28 मार्च ते
गुरुवार दि. २ एप्रिल या कालावधीत भव्य दशावतार नाट्यमहोत्सव व सार्वजनिक
श्री हनुमान जन्मोत्सव २०२६ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.शनिवार दि. २८ मार्च रोजी सायंकाळी ७ वा. महापुरुष कलावैभव दशावतार नाट्य मंडळ, देवबाग यांचा ‘मुंगुस सर्प संग्राम.. अर्थात नकुला देवी’ ने शुभारंभ झाला आहे. रविवार दि. २९ मार्च रोजी सायंकाळी ७ वा.
खानोलकर दशावतार नाट्य मंडळ, खानोली यांचा
‘दक्ष उत्पत्ती’,
सोमवार दि. ३० मार्च रोजी सायंकाळी ७ वा.
वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ, तेंडोली यांचा
“भ्रूनगश्री अवतार “,
मंगळवार दि. ३१ मार्च रोजी सायं. ७ वा. दत्तमाऊली दशावतार, नाट्य मंडळ, दाभोली यांचा ‘मार्जार’,
बुधवार दि. १ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वा.
रामेश्वर दशावतार नाट्य, मंडळ, वेंगुर्ला यांचा
‘रुई महात्म्य’ आदी दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहेत. गुरुवार दि. २ एप्रिल रोजी पहाटे. ४.३०. वा.श्री मारुतीला अभिषेक व पुजा, पहाटे ५ वा. ह.भ.प. डॉ. रमेश पाटकर (माणगांव) यांचे सुश्राव्य-किर्तन,
सकाळी ६ वाजता “श्री हनुमान जन्मोत्सव” निमित्त पुष्पवृष्टी, आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी ५ वा. श्री सत्यनारायण महापूजा व तीर्थप्रसाद, सायंकाळी ७ वा.
पार्सेकर दशावतार नाट्यमंडळ, वेंगुर्ला यांचा
‘गोमय वज्रांग धारी’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.उत्सवात दर दिवशी सायंकाळी ६.३० वा. श्री मारुतीरायाची आरती होणार आहे. भाविकांनी या सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन श्री हनुमान मंदीर सेवा न्यास, वेंगुर्ला यांच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page