⚡मालवण ता.२८-:
रोटरी क्लब मालवण व आरसीसी क्लब मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण येथील लिमये हॉस्पिटल मध्ये मधुमेहग्रस्त रुग्णांच्या मोफत नेत्रपटल (डोळ्याचा पडदा) OCT तपासणी शिबिर संपन्न झाले. या शिबिराचा ५२ रुग्णांनी लाभ घेतला. त्यापैकी ७ जणांना पुढील उपचाराची आवश्यकता असून त्यांच्यावर सांगली येथे मोफत उपचार करण्यात येणार आहेत.
या शिबिरासाठी रोटरी क्लब ऑफ सांगली मिडटाऊन व सुदर्शन आय हॉस्पिटल सांगली यांची मोबाईल व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली होती. शिबिराचे उदघाट्न सांगली मिडटाऊन रोटरी क्लबचे रो. मल्लिकार्जुन बड्डे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी डाॅ. सुरेश वाघ यांच्यासह मालवण रोटरी क्लब अध्यक्ष पंकज पेडणेकर, सेक्रेटरी रंजन तांबे, डॉ. अजित लिमये, डॉ. लीना लिमये, महादेव पाटकर, राजेश पारधी, रमाकांत वाक्कर, उमेश सांगोडकर, सुहास ओरसकर, प्रदीप सामंत, मिथिलेश मिठबावकर, प्रसन्नकुमार मयेकर, अभय कदम, प्रविणा शिंदे आदींसह लिमये हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.
