⚡बांदा ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी शिक्षक मंडळाच्या वतीने सन 2025-26 या वर्षासाठी विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये आदर्श हिंदी शिक्षिका, आदर्श मुख्याध्यापक तसेच हिंदी प्रचारक आणि विशेष सन्मान पुरस्कारांचा समावेश आहे.
यावर्षी आदर्श हिंदी शिक्षिका पुरस्कार मोंड हायस्कूल, देवगड येथील सौ. असावरी सुनील कदम यांना जाहीर झाला आहे. तसेच स्व. हनुमंत गोविंद दळवी स्मृती आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार पेंढरी विद्यालय, ता. देवगड येथील सत्यपाल लाडगावकर यांना जाहीर करण्यात आला आहे.
जिल्ह्यात हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार करणाऱ्या शिक्षकांना दिला जाणारा आदर्श हिंदी प्रचारक पुरस्कार यावर्षी पुढील शिक्षकांना जाहीर झाला आहे :
सौ. विविधा विद्याधर देसाई (भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय, माजगाव-सावंतवाडी), सौ. शारदा गावडे (मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी), सौ. अनुजा अमरसिंग सावंत (डिगस हायस्कूल, कुडाळ), महेंद्र पारिपत्ते (आचरा हायस्कूल, मालवण), राजेश नारकर (नांदगाव हायस्कूल), धाकलू डवरी (शिरगाव, देवगड), सौ. श्रेया तावडे (नारंगी हायस्कूल, देवगड) आणि सौ. विशाखा कांबळे (वैभववाडी). याशिवाय विशेष सन्मान पुरस्कार कनेडी हायस्कूलचे क्रीडा शिक्षक बयाजी महादेव बुराण यांना जाहीर करण्यात आला आहे.
वरील सर्व पुरस्कारांचे वितरण रविवार, दिनांक 29 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या मंडळाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व हिंदीप्रेमी शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सुमंत दळवी, कार्याध्यक्ष कैलास जाधव आणि सचिव सदाशिव सावंत यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी शिक्षक मंडळाचे विविध पुरस्कार जाहीर…
