Headlines

Global Maharashtra Breaking News

रोजगाराच्यादृष्टीने खाऱ्या आणि गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीचे ज्ञान अवगत करा

मालवणचे प्रभारी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त रवींद्र मालवणकर यांचे प्रतिपादन *💫मालवण दि.१०-:* समुद्रात फक्त कॅच फिशिंग होते. त्यामुळे समुद्रातील मत्स्य उत्पादन कमी कमी होत आहे. अशावेळी मत्स्य संवर्धन शेतीकडे वळणे गरजेचे आहे. आज नोकरीच्या संधी कमी आहेत. त्यामुळे रोजगार मिळविण्याच्या दृष्टीने खाऱ्या आणि गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीचे ज्ञान अवगत करून रोजगाराच्या दृष्टीने वाटचाल केली पाहिजे…

Read Full News

मुंबई महापौरांचे नगरसेवक सुशांत नाईक यांनी केले स्वागत

महापौरांनी दिल्या संघटना वाढीच्या सूचना *💫कणकवली दि.१०-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्‍यावर असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचे कणकवलीत शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक यांनी स्वागत केले. शिवसेना पक्ष वाढी संदर्भात सौ .पेडणेकर यांच्याशी सुशांत नाईक यांनी चर्चा केली. तसेच महापौर सौ. पेडणेकर यांनी संघटना वाढीसंदर्भात सूचनाही दिल्या. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते योगेश मुंज व अन्य उपस्थित होते.

Read Full News

जिल्हा पोलीस विभागाच्या सायबर क्राईमच्या बोलेरो गाडीचा झाराप येथे अपघात

झाडीत जाऊन गाडी धडकल्याने सायबर क्राईमचे तीन कर्मचारी जखमी *💫कुडाळ दि.१०-:* सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस विभागाच्या सायबर क्राईमच्या बोलेरो गाडीचा मुंबई- गोवा महामार्गावर झाराप कारगिल हॉटेल जवळ स्लिप होऊन अपघात झाला जवळच असलेल्या झाडीत जाऊन गाडी धडकल्याने सायबर क्राईमचे तीन कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात उपचारासाठी…

Read Full News

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी नाम.नारायण राणे यांची घेतली दिल्लीत भेट

कॅबिनेटमंत्री पदी निवड झाल्याबद्दल कणकवली शहरवासीयांतर्फे दिल्या शुभेच्छा *💫कणकवली दि.१०-:* देशाच्या सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग कॅबिनेट मंत्री पदी सिंधुदुर्गचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची निवड झाल्याबद्दल नारायण राणे यांचे कट्टर कार्यकर्ते समजले जाणारे कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिल्ली येथे नारायण राणे यांची भेट घेतली व त्यांना शुभेच्छा दिल्या. नारायण राणे…

Read Full News

अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी होण्यासाठी वाहनचालकांना खारेपाटण येथे जनजागृती

*💫कणकवली दि.१०-;* देशात सध्या महामार्गावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालले असून त्यांना रोखण्यासाठी व वाहनचालकामध्ये जनजागृती करण्यासाठी महामार्ग मृत्यूनजय दूत सिंधुदुर्ग व रत्नागिरी यांच्या वतीने मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग वरील खारेपाटण येथे प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला.व शिस्तीचे व नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचलकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला खारेपाटण सरपंच रमाकांत…

Read Full News

देवगडात लोकमतच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी अयोध्याप्रसाद गांवकर यांचे यशस्वी आयोजन *💫देवगड दि.१०-:* येथे उमाबाई बर्वे लायब्ररीमध्ये दैनिक लोकमत तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. देवगड तालुका रक्तदान शिबिराची जबाबदारी लोकमतचे प्रतिनिधी अयोध्याप्रसाद गावकर यांच्याकडे देण्यात आली होती. ही जबाबदारी चोखपणे बजावून रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडले आहे. या रक्तदान शिबिराला उत्फुर्तपणे रक्तदात्यांचा प्रतिसाद मिळाला आहे. या रक्तदान शिबिराच्या…

Read Full News

खा राऊत यांच्या उपस्थितीत वैभववाडीत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

जावेद पाटणकर, जितेंद्र तळेकर, ज्ञानेश्वर फोंडके, गौस पाटणकर, प्रथमेश तळेकर यांना संधी वैभववाडी प्रतिनिधी शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेना वैभववाडी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या . यामध्ये जावेद पाटणकर यांची अल्पसंख्याक शिवसेना तालुका प्रमुख जितेंद्र तळेकर यांची विभाग प्रमुख (कोळपे जि. प,ज्ञानेश्वर फोंडके यांची उपविभाग प्रमुख (भुईबावडा पंचायत समिती), गौस…

Read Full News

कोरोना काळात अहोरात्र मेहनत घेणाऱ्या कोरोना योध्याचा खासदार विनायक राऊत यांच्याहस्ते सत्कार

वैभववाडी प्रतिनिधी तालुक्यात आपल्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या तहसिलदार रामदास झळके, पोलिस निरिक्षक अतुल जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. सयाजी धर्मे यांचा कोविड योद्धा म्हणून वैभववाडी शिवसेनेच्या वतीने सन्मान खा राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. बळीराजा आत्मसन्मान योजनेच्या शुभारंभ प्रसंगी खासदार विनायक राऊत वैभववाडी येथे आले होते….

Read Full News

शेतकऱ्यांनी परप्रांतीयाना जमीन न विकता त्यात काजू लागवड करावी

खासदार विनायक राऊत यांचे आवाहन वैभववाडी प्रतिनिधी शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती साधण्यासाठी बळीराजा आत्मसन्मान ही योजना आहे फायदेशीर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त काजुची झाडे लावावीत आता काजुतूनच क्रांती होणार कोल्हापूर-विजयदुर्ग रेल्वे मार्ग हा मार्ग आम्ही पुर्णत्वास नेणार मार्ग होणार यामुळे पश्चिम महाराष्ट्र व कोकण जोडले जाणार शेतकऱ्यांना पायावर उभे राहण्यासाठी ही योजना सन्मानजनक खा.राऊत यांनी या योजनेचे…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ४८ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.१० -:* सावंतवाडी तालुक्यात आज ४८ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ९ तर ग्रामीण भागात ३९ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात जुनाबाझार १, सर्वोदय नगर १, फिश मार्केट २, बिरोडकर टेंब १, सावंतवाडी ४ तर ग्रामीण भागात आंबोली १, पारपोली १, बांदा…

Read Full News

You cannot copy content of this page