कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी नाम.नारायण राणे यांची घेतली दिल्लीत भेट

कॅबिनेटमंत्री पदी निवड झाल्याबद्दल कणकवली शहरवासीयांतर्फे दिल्या शुभेच्छा

*💫कणकवली दि.१०-:* देशाच्या सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग कॅबिनेट मंत्री पदी सिंधुदुर्गचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची निवड झाल्याबद्दल नारायण राणे यांचे कट्टर कार्यकर्ते समजले जाणारे कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिल्ली येथे नारायण राणे यांची भेट घेतली व त्यांना शुभेच्छा दिल्या. नारायण राणे मंत्री व्हावेत ही त्यांच्या व भाजपाच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात नारायण राणे यांची महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग कॅबिनेट मंत्री पदी निवड झाली. त्यानंतर तातडीने नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिल्ली येथे धाव घेत नारायण राणे यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत जि. प. अध्यक्षा संजना सावंत, माजी जि. प. उपाध्यक्ष संदेश सावंत, जि. प उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, नगरसेवक अभिजीत मुसळे, माजी नगरसेवक बंडू गांगण आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page